मुंबई- महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळून आलेला नाही. प्रत्येकाने स्वत:ची स्वच्छता राखावी. उपचारापेक्षा प्राथमिक काळजी घेणे केव्हाही चांगले असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा एकही लागण झालेला रुग्ण आढळला नाही - राजेश टोपे
आतापर्यंत कोरोनाचे ६ संशयित प्रवासी आढळून आले असून, त्यापैकी २ पुण्यात तर ४ मुंबईत आहेत. त्यांची योग्य काळजी घेण्याची आवशक्यता आहे. ५५० विमानातील ६५ हजार यात्रेकरूंची थर्मल चाचणी करण्यात आली असून, त्यामध्ये ६ संशयित प्रवासी आढळून आले आहे.
आतापर्यंत कोरोनाचे ६ संशयित प्रवासी आढळून आले असून, त्यापैकी २ पुण्यात तर ४ मुंबईत आहेत. त्यांची योग्य काळजी घेण्याची आवशक्यता आहे. ५५० विमानातील ६५ हजार यात्रेकरूंची थर्मल चाचणी करण्यात आली असून, त्यामध्ये ६ संशयित यात्री आढळून आले आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत चाचणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवाल येणे बाकी आहे, अशी माहितीही मंत्री रोजेश टोपे यांनी दिली.
हेही-मराठवाडा ग्रीड प्रकल्प : आर्थिक व्यवहार्यता बघून धोरणात्मक निर्णय घेऊ- अजित पवार