महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वायव्य मुंबई : शिवसेनेचे कीर्तीकर विजयी, काँग्रेसच्या संजय निरुपम यांना केले चितपट - sanjay nirupam

या मतदारसंघात शिवसेनेचे गजानन कीर्तिकर दुसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत, तर त्यांच्यासमोर मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचे आव्हान आहे.

मुंबई

By

Published : May 23, 2019, 5:59 AM IST

Updated : May 23, 2019, 8:12 PM IST

LIVE UPDEATE -

  • शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार गजानन कीर्तीकर विजयी, मुंबई काँग्रेस माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचा केला पराभव
  • 7.15 - 1 लाख 79 हजारांनी कीर्तीकर आघाडीवर.. गजानन किर्तीकर - 479368, संजय निरुपम - 257069
  • 4.30 - तेरावी फेरी आघाडी : गजानन किर्तीकर - 307375, संजय निरुपम - 172334
  • 1.58 - मुंबई वायव्य मतदारसंघातील शिवसेनेचे गजानन कीर्तिकर आणि काँग्रेसचे संजय निरुपम यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निरुपम यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण, त्यांना क्षणीक आनंद घेण्याची संधीही कीर्तिकर यांनी दिली नाही. या लढतीत पहिल्या फेरीपासूनच कीर्तीकर आघाडीवर आहेत. आता चौथ्या फेरीत देखील ते आघाडी टिकवून आहेत. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार संघ समजला जातो. पण या मतदारसंघात काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांना हरवून कीर्तिकर यांनी हा मतदारसंघ काबीज केला होता. हा मतदारसंघ पुन्हा घेण्यासाठी निरुपम यांनी जंग पछाडले. पण त्यांना सध्यातरी यश मिळताना दिसत नाही आहे. कीर्तिकर यांनी 50 हजारापेक्षा जास्त मतांची आघाडी घेतली आहे. अजून काही फेऱ्या बाकी आहे. यात निरुपम काही चमत्कार करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
  • 1.30 - सहावी फेरी : गजानन किर्तीकर - 119425, संजय निरुपम - 64347
  • 12.15 - शिवसेनेचे गजानन कीर्तीकर ५३ हजार ३६३ मतांनी आघाडीवर, काँग्रेसचे संजय निरुपम पिछाडीवर
  • 10.26 - दक्षिण मुंबई मतदारसंघात सेनेचे अरविंद सावंत 23746 मतांनी आघाडीवर, काँग्रेसचे मिलिंद देवरा सातत्याने पिछाडीवर.
  • 10.25 - पहिल्या फेरीत गजानन कीर्तिकर आघाडीवर.. कीर्तीकर- २१२२४, संजय निरुपम- ११६२४
  • 9.00 - शिवसेनेचे गजानन कीर्तीकर आघाडीवर

मुंबई - वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार, याचा फैसला आज होणार आहे. मतमोजणीला सुरू आहे. येथील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे गजानन कीर्तिकर दुसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत, तर त्यांच्यासमोर मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचे आव्हान आहे.

२९ एप्रिल रोजी या मतदारसंघात मतदान झाले होते. २०१४ च्या निवडणुकीपेक्षा यावेळी जवळपास ४ टक्के जादा मतदान झाल्याने वाढलेला टक्का कोणाच्या पारड्यात पडणार याची चर्चा मतदारसंघात आहे. यावेळी ५४.२६ टक्के मतदान झाले. तर २०१४ ला या मतदारसंघात ५०.५७ टक्के मतदान झाले होते.पश्चिम उपनगरांतील झपाट्याने विकसित झालेला भाग अशी वायव्य मतदारसंघाची ओळख आहे. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. गुरूदास कामत यांचा दांडगा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची तगडी फौजही २०१४ मध्ये मोदी लाटेला थोपवू शकली नव्हती. शिवसेनेचे गजानन कीर्तिकर तब्बल एक लाख ८३ हजारांचे मताधिक्य घेत विजयी झाले होते. त्यामुळे पुन्हा कीर्तिकरांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली.

पक्षीय बलाबल -

एकीकडे अंधेरी ते गोरेगाव पट्ट्यात वसलेले बंगले तर दुसरीकडे झोपडपट्टी असे या मतदारसंघातील चित्र आहे. वर्सोवा परिसरातील कोळीवाडे, अंधेरी पूर्वेकडील गावठाण परिसर, नेहमीच चर्चेत राहिलेला आरेचा हरित पट्टा ही याच भागाची ओळख. अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, वर्सोवा, गोरेगाव, दिंडोशी आणि जोगेश्वरी पूर्व या सहा विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे. सहापैकी जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व हे तीन मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. तर गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम हे तीन विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहे.

2014 लोकसभा निवडणुकीतील परिस्थिती..

गजानन कीर्तीकर (शिवसेना) ४ लाख ६४ हजार ८२०

गुरुदास कामत (काँग्रेस) ०२ लाख ८१ हजार ७९२

महेश मांजरेकर (मनसे) ६६ हजार ८८

मयांक गांधी (आप) ५१ हजार ८६०

नोटा - ११ हजार ०९

Last Updated : May 23, 2019, 8:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details