महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उत्तर मुंबईत मतदार घटले; मात्र मतदानाच्या टक्केवारीत वाढ - election

२०१४ ला उत्तर मुंबईत १७ लाख ८३ हजार ८७० मतदार होते. तर २०१९ मध्ये १६ लाख ४७ हजार २०८ मतदारांची संख्या आहे.

उत्तर मुंबईत मतदारांमध्ये घट तरी मतदानात वाढ

By

Published : May 1, 2019, 12:58 PM IST

मुंबई -भाजपचा पारंपरिक गड मानला जाणाऱ्या उत्तर मुंबईत २०१४ च्या तुलनेत मतदारांमध्ये १ लाख २८ हजार २०८ मतदारांची घट झाली आहे. तरी मुंबईतील ६ लोकसभा क्षेत्रापैकी या मतदारसंघात सर्वाधिक ६० टक्के मतदान झाले आहे.

२०१४ ला उत्तर मुंबईत १७ लाख ८३ हजार ८७० मतदार होते. तर २०१९ मध्ये १६ लाख ४७ हजार २०८ मतदारांची संख्या आहे. यात ८ लाख ९० हजार पुरुष व ७ लाख ५६ हजार ८४७ महिला मतदार आहेत. उत्तर मुंबईत २०१४ च्या तुलनेत गेल्या ५ वर्षांत १ लाख २८ हजार मतदारांची घट झाली असतानाही या मतदारसंघात वाढलेला मतदानाचा टक्का कोणाला तारणार हे येत्या २३ तारखेला स्पष्ट होईल.


२०१४ तुलनात्मक आकडेवारी

विधानसभा मतदार मतदान टक्केवारी
बोरिवली ३ लाख १४ हजार २४९- ५७.३० टक्के
दहिसर ३ लाख ६ हजार ५८० - ५२.२४ टक्के
मागाठाणे ३ लाख ३ हजार २५७- ५०.८३ टक्के
कांदिवली २ लाख ६२ हजार ४१३- ९८ टक्के
चारकोप ३ लाख ७ हजार २८४ - ५२.१७ टक्के
मालाड २ लाख ९० हजार ८७- ५१.३६ टक्के

२०१९ विधानसभानिहाय तुलनात्मक आकडेवारी
बोरिवली १ लाख ९३ हजार ९८- ६६.१९ टक्के
दहिसर १ लाख ६५ हजार ३७४ - ६२.३९ टक्के
मागाठाणे १ लाख ५४ हजार ८४२ - ५७.७२ टक्के
कांदिवली १ लाख ४७ हजार ७४४- ५५.७१ टक्के
चारकोप १ लाख ७१ हजार ९११- ६०.८० टक्के
मालाड १ लाख ६४ हजार २८३ - ५६..८२ टक्के

ABOUT THE AUTHOR

...view details