मुंबई - कथित दहशतवादी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. वैद्यकीय कारणास्तव ते रुग्णालयात दाखल आहेत. मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी झाली.अत्यंत मुद्देसूद रीतीने मालिक यांच्या बाजूने युक्तिवाद केला. मात्र याचिकेमध्ये केलेल्या दाव्याच्या समर्थनार्थ वैद्यकीय अहवाल आणि त्याचे कागदपत्र हे संपूर्ण रीतीने जोडले नसल्यामुळे उद्या पुन्हा याचिकेच्या संदर्भात सुनावणी निश्चित केलेली आहे.
न्यायालयात आज काय झाले -नबाब मलिक वैद्यकीय कारणास्तव दवाखान्यामध्ये दाखल आहेत. त्यांना जामीन मिळावा असा त्यांनी अर्ज उच्च न्यायालयात केला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई यांनी महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. त्यांनी आजच्या अल्पशा झालेल्या चर्चेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या परिपत्रकाचा संदर्भ दिला. सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच एक परिपत्रक जारी केलेले आहे. त्यामध्ये निर्देश दिलेले आहेत की जामीन अर्जासंदर्भातील अशा सुनावण्या केवळ दहा मिनिटे या कालावधीतच आटोपाव्या अन्यथा त्यापेक्षा जास्त वेळ लागायला नको. न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई मालिक यांच्या वकिलांना म्हणाल्या की, गुणवत्तावर आधारित युक्तिवाद करावा म्हणजे वेळेत होईल. तसेच केवळ मेडिकल आणि गुणवत्ताआधारे विधान केल्यास वेळ वाचेल. मालिक यांचे वाकिल अमित देसाई यांनी न्यायालयाची सूचना मान्य करत युक्तिवाद केला.
न्यायालयाचा सवाल आणि नवाब मलिक यांच्या वकिलांचे जवाब - मलिक यांना कसे आणि केव्हा ईडीकडून अटक केली गेली. मालिक सध्या वैद्यकीय नियमित तपासणी आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. कारण त्यांच्या किडन्या खराब नाकामी झाल्या आहेत. त्याबाबत विशेष रुग्णालयात उपचारासाठी मलिक यांना दाखल केले आहे. वास्तविक आधी एक किडनी खराब झाली. मात्र दुसरी किडनी केवळ 60 टक्के काम करीत आहे. म्हणजेच 40 टक्के नियमित रीतीने काम करत नाहीय. हे वास्तव देखील मलिक यांच्या दाव्यात वाकील देसाई यांनी मांडले.