मुंबई:मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती शुकरे आणि न्यायमूर्ती खट्टा यांच्या खंडपीठांसमोर ही सुनावणी सुरू होती. तेव्हा नवाजुद्दीन सिद्दिकी याच्या वकिलांनी बाजू मांडली की "बापाला आपल्या मुलांना भेटू दिले जात नाही. कोणत्याही मुलांच्या जन्मदात्याला भेटू दिले जाणे हा मुलांचा देखील हक्क आहे .आणि बापांचा देखील तो हक्क आहे. परंतु नवाजुद्दीन सिद्दिकी याची पत्नी ही पतीला आपल्या मुलांना भेटू देत नाही ;"असा स्पष्टपणे आरोप त्यांनी आपल्या याचिकेमध्ये केला.
पत्नीच्या वकिलाचा युक्तिवाद: पत्नीच्या बाजूने वकिलांनी देखील जोरदार युक्तिवाद केला की, कोणता पुरावा आहे. की नवाजुद्दीन सिद्दिकी हा त्या मुलांचा बाप आहे आणि पत्नीने त्यांना आपल्या मुलांना भेटण्यापासून रोखल आहे. जर नवाजुद्दीन सिद्दिकी यांना पत्नी आलिया कुठे राहते हे माहित आहे. म्हणजेच ती पत्नी आपल्या आईकडे राहत आहे ही जर भाग नवाजुद्दीन सिद्दिकी यांना माहिती आहेत तर लहान मुलं आईला सोडून जातील कुठे त्यामुळे जिथे पत्नी आहे. तिथे जवळच मुलं असतील ही साधी सोपी सहज बाब आहे तरीही नवाजुद्दीन सिद्दिकी याचे वकील मात्र ही बाब जाणीवपूर्वक का सांगत नाही ?असा सवाल पत्नी आलियाच्या वतीने अधिवक्ता यांनी न्यायालयासमोर उपस्थित केला.