मुंबई -धुलिवंदनाचा सण देशभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. मात्र, चीनमधील कोरोना विषाणूच्या संसर्ग देशभरात पसरत आहे. त्यामुळे याची लागण होऊ नये म्हणून दक्षता घेत मुंबईकरांनी देखील दरवर्षीप्रमाणे धुलीवंदन साजरी केली नाही. धुलीवंदन निमित्त होणाऱ्या मुंबईतील पार्ट्या देखील रद्द करण्यात आलेले आहे.
मुंबईत कोरोनामुळे धुलिवंदनाच्या उत्साहावर विरजण; फक्त चिमुकल्यांकडून धुळवड साजरी - dhulivandan celebration
धुलिवंदनाचा सण देशभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. मात्र, चीनमधील कोरोना विषाणूच्या संसर्ग देशभरात पसरत आहे. त्यामुळे याची लागण होऊ नये म्हणून दक्षता घेत मुंबईकरांनी देखील दरवर्षीप्रमाणे धुलीवंदन साजरी केली नाही.
हेही वाचा -रंग विकणाऱ्या छोट्या विक्रेत्यांना कोरोना विषाणूचा फटका; विक्रीवर परिणाम
दरवर्षी मुंबईत मोठ्या प्रमाणात धुलीवंदन नागरिक आणि सेलिब्रिटी साजरी करतात. मात्र, शासनाने आणि पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरे गर्दी टाळावी, असे आवाहन केले होते. याची दक्षता घेत मुंबईकरांनी दरवर्षीप्रमाणे होळी साजरी केली नाही .फक्त लहानग्यांनी नैसर्गिक रंगांचा वापर करत धुळवड साजरी केली आहे. देशभरात कोरोना झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे चीनी रंगांचा देखील वापर मुंबईकरांनी या वर्षी केलेला नाही.