मुंबई -संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंनी अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ( Bjp Mla Nitesh Rane in Supreme Court ) याआधी जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला आहे. यानंतर नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून या अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
संतोष परबवर हल्ला केल्याप्रकरणी ( Attack on Santosh Parab ) भाजपचे आमदार नितेश राणे ( Bjp Mla Nitesh Rane ) अडचणीत आले आहेत. उच्च न्यायालयाने नितेश राणेंना दणका दिला आहे. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. ( High Court Denied Pre arrest Bail of Nitesh Rane ) असे असले तरी त्यांना पोलीस तातडीने अटक करू शकत नाहीत. त्यांना अटकेपासून दिलेले संरक्षण 27 जानेवारीपर्यंत वाढवले आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी ही मुभा देण्यात आली होती. आता त्यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.