महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महादेव जानकरांना माशाचे ५ प्रकार तरी माहीत आहेत का ? निलेश राणेंचा टोला - mahadev-jankar

मासेमारी करणाऱ्या लोकांच्या प्रश्नावरुन आमदार नितेश राणे हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ज्यांना मत्स व्यवसायासंबंधी काहीच माहीती नाही, अशांना त्या खात्याचा कारभार दिला असल्याचे म्हणत नितेश राणेंनी मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर यांच्यावर निशाणा साधला.

निलेश राणेंचा जानकरांना टोला

By

Published : Jun 23, 2019, 6:22 PM IST

मुंबई - मासेमारी करणाऱ्या लोकांच्या प्रश्नावरुन आमदार नितेश राणे हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ज्यांना मत्स्य व्यवसायासंबंधी काहीच माहिती नाही, अशांना त्या खात्याचा कारभार दिला असल्याचे म्हणत नितेश राणेंनी मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर यांच्यावर निशाणा साधला. जानकरांनी मासेमारीच्या प्रश्नासंबंधी ५ वर्षात काय केले ते सांगावे. तसेच जानकरांना माशाचे ५ प्रकार तरी सांगावेत, असे म्हणत जानकरांना लक्ष केले.

निलेश राणेंचा जानकरांना टोला

कोकणच्या मासेमारांच्या प्रश्नासंबधी कोण लक्ष देण्यास तयार नाही. ५ वर्षात मत्स्यमंत्री महादेव जानकरांनी काय केले हे सांगावे. आम्ही प्रश्न विचारुन थकलोय, पण कोण उत्तरे देत नाहीत. जानकर साहेब वेंगुर्ल्यामध्ये येऊन स्वत:च एलईडी मासेमारी करत असल्याचे नितेश राणे म्हणाले. न्याय द्यायचा असेल तरच भाषण करा नाहीतर उर्वरीत दिवसांसाठी या खात्याचा कारभार दुसऱ्याकडे सोपवा, असेही नितेश राणे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details