मुंबई - वांद्रे-कुर्ला संकुल येथील नॉन क्रिटिकल कोविड सेंटरलाही चक्रीवादळाचा फटका बसला आहे. ज्या एमएमआरडीएच्या मैदानात हे कोविड सेंटर आहे, तिथे सर्वत्र चिखल झाला होता. तर दुसऱ्या कोविड सेंटरचे काम सुरू असून या कामासाठीचे समान ही अस्तव्यस्त पडलेले पाहायला मिळाले.
बीकेसी कोविड सेंटर नुकतेच रुग्णसेवेसाठी खुले करण्यात आले आहे. मंगळवारपर्यंत येथे 242 सौम्य लक्षणे असलेले रूग्ण उपचार घेत होते. मात्र, निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी अचानक त्यांना वरळीतील डोम सेंटरमध्ये हलवण्यात आले.
बीकेसी कोविड सेंटरलाही 'निसर्ग' चक्रीवादळाचा फटका
बीकेसी कोविड सेंटर नुकतेच रुग्णसेवेसाठी खुले करण्यात आले आहे. मंगळवारपर्यंत येथे 242 सौम्य लक्षणे असलेले रूग्ण उपचार घेत होते.
निसर्ग चक्रीवादळ
बीकेसी कोविड सेंटर हे तात्पुरते बांधकाम असून वॉटरप्रूफ आहे. तर पावसाळ्यात या परिसरात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेता उंच बेसमेंट करण्यात आले होते. मात्र, मुंबईत आज चक्रीवादळ धडकणार होते. यामुळे या बांधकामाला फटका बसण्याची शक्यता होती. त्यानुसार येथील रुग्णांना इतरत्र हलविण्यात आले आहे.
त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा हा निर्णय योग्य ठरला आहे. मुंबईत निसर्ग चक्रीवादळ धडकले नाही, पण तरीही त्याच्या परिणामाने या कोविड सेंटरचे नुकसान झाले आहे.