महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नेरूळमध्ये आढळला साडेनऊ फूट लांबीचा अजगर - सर्पमित्र अजगर सुटका

नवी मुंबईतील नेरूळ परिसरात असणाऱ्या सेक्टर 34 मध्ये टीएस चाणक्य विद्यापीठामध्ये काही तरी सरपटत असल्याचे तेथील लोकांना पाहायला मिळाले होते. ही माहिती सर्पमित्राला कळवल्यानंतर पुनर्वसू फाऊंडेशनचे सर्पमित्र तनय जुवेकर यांनी अजगराची सुटका केली.

nine foot big  Python found in Nerul
नेरूळमध्ये आढळला साडे नऊ फूट लांबीचा अजगर

By

Published : Dec 28, 2019, 1:29 PM IST

मुंबई - नवी मुंबईमध्ये दिवसागणिक सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढत आहे. घणसोली परिसरात साडेसात फुटांचा अजगर आढळल्यानंतर नवी मुंबईतील नेरुळ परिसरात चक्क साडेनऊ फुटांचा अजगर आढळला.

नेरूळमध्ये आढळला साडेनऊ फूट लांबीचा अजगर

हेही वाचा - भिवंडीत २१ लाखांचा बेकायदेशीर केमिकलसाठा जप्त; एकास अटक

नवी मुंबईतील नेरूळ परिसरात असणाऱ्या सेक्टर 34 मध्ये टीएस चाणक्य विद्यापीठामध्ये काही तरी सरपटत असल्याचे तेथील लोकांना पाहायला मिळाले होते. ही माहिती सर्पमित्राला कळवल्यानंतर पुनर्वसू फाऊंडेशनचे सर्पमित्र तनय जुवेकर घटनास्थळी पोहोचले. जुवेकर यांच्या माहितीनुसार हा भारतीय जातीचा अजगर असल्याचे निष्पन्न झाले. कोणतीही इजा न होऊ देता त्यांनी सुखरूपरित्या अजगराला पकडले व अजगराला जंगलात सोडून दिले.

अजगराची उंची साधारणतः साडेनऊ फूट इतकी होती तर वजन 25 किलोच्या आसपास होते. अजगराला नेरुळ परिसरातील पाम बीच रोड मधील कांदळवनात सोडण्यात आले. प्रथमच नवी मुंबईत इतका मोठा अजगर आढळल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा -ठाण्यात भाजप नगरसेवकावर अत्याचाराच्या गुन्ह्यानंतर ठार मारण्याच्या धमकीचाही गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details