मुंबई - माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. जर छत्रपती शिवाजी महाराजांकडे उद्धव ठाकरेंसारखे मावळे असते तर महाराज यशस्वी झाले नसते. महाराजांनी उद्धव ठाकरेंना टक मक टोकावरून फेकून दिले असते, असे ट्विट करत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष केले आहे.
आज महाराज असते तर उद्धव ठाकरेंना... निलेश राणेंचा निशाणा
माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. जर छत्रपती शिवाजी महाराजांकडे उद्धव ठाकरेंसारखे मावळे असते तर महराज यशस्वी झाले नसते. महाराजांनी उद्धव ठाकरेंना टक मक टोकावरून फेकून दिले असते, असे वक्तव्य करत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण वैध असल्याचा निर्णय दिल्यानंतर, आता पुढची लढाई दिल्लीत गेली तरी जिंकूच, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला होता. तसेच मराठा, मराठेतर अशा वादात न पडता आपण सगळे शिवरायांचे मावळे म्हणून एकत्र येऊ. तसे झाल्यास जगात वेगळी ताकद निर्माण होऊ शकेल असेही ठाकरे म्हणाले होते. त्यावर निलेश राणेंनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. निवडणुका जवळ आल्या म्हणून उद्धव ठाकरे बोलत असल्याचे म्हणत निलेश राणेंनी ठाकरेंना लक्ष केले.
काही केल्या ठाकरे-राणे वाद मिटायला तयार नाही. सातत्याने ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. आता निलेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेना काय प्रतिक्रिया देते ते पाहणे गरजेचे आहे.