महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता बुधवारी रात्री 12 पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर... - Etv Bharat

विश्वकरंडक स्पर्धेत भारताची विजयी सलामी; दक्षिण आफ्रिकेवर ६ गडी राखुन विजय. खासदारांप्रमाणेच विद्यमान आमदारांचीही भाजप तिकीटे कापणार; आमदारांचे धाबे दणाणले. शिवसेनेचे पुन्हा दबावतंत्र; खासदारांना घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार. अंधेरीत मद्यधुंद हवाई सुंदरीवर बलात्कार; आरोपी अटकेत. धक्कादायक! सांगलीच्या बाजारात चक्क प्लास्टिकची अंडी; अन्न-औषध प्रशासनाची कारवाई

आज...आत्ता बुधवारी रात्री 12 पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर...

By

Published : Jun 5, 2019, 11:33 PM IST

विश्वकरंडक स्पर्धेत भारताची विजयी सलामी; दक्षिण आफ्रिकेवर ६ गडी राखुन विजय

साऊथहॅम्प्टन - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात द रोझ बाऊल क्रिकेट मैदानावर एकदिवसीय सामना रंगला होता. दक्षिण आफ्रिकेला नमवत भारताने स्पर्धेमध्ये विजयाने खाते खोलले आहे. दक्षिण आफ्रिकेवर ६ गडी राखुन विजय मिळवला. रोहित शर्माच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताला विजयाचे लक्ष गाठता आले. त्याने १४४ धावांमध्ये १२२ धावा केल्या. वाचा सविस्तर

खासदारांप्रमाणेच विद्यमान आमदारांचीही भाजप तिकीटे कापणार; आमदारांचे धाबे दणाणले
मुंबई - खासदारांप्रमाणेच विद्यमान आमदारांचीही आगामी निवडणुकीत भाजप तिकीट कापणार असल्याची भाजपच्या गोटात चर्चा असल्याने अनेक आमदारांचे धाबे दणाणले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेत अनेक विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आमदारांची जिंकून येण्याची स्तिथी नसल्याचे या सर्व्हेत समोर आले होते. यामध्ये 1-2 नाही तर तब्बल 30 टक्के विद्यमान आमदारांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षातून भाजपमध्ये दाखल होणाऱ्या बड्या नेत्यांना सामावून घेण्याचे मोठे आव्हानही भाजप समोर आहे. वाचा सविस्तर

शिवसेनेचे पुन्हा दबावतंत्र; खासदारांना घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर दबाव तंत्राचा अवलंब करत राम मंदिराच्या मुद्यावर रान उठवले होते. परिणामी २ अधिकच्या जागा त्यांना लोकसभेत मिळाल्या होत्या. विधानसभेच्या तोंडावरही राम मंदिराचा मुद्दा उकरून काढत शिवसेना भाजपवर दबाव तंत्राचा वापर करत आहे. एकीकडे भाजपकडून विधानसभेच्या जागावाटपाचे सूतोवाच करण्यात आले आहे. त्याला शिवसेनेचा विरोध आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका न घेता सेनेने दबाव तंत्राला पसंती दिली असल्याचे चर्चिले जात आह. वाचा सविस्तर

अंधेरीत मद्यधुंद हवाई सुंदरीवर बलात्कार; आरोपी अटकेत
मुंबई - हवाई सुंदरीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. स्वप्नील अरुणकुमार बडोनिया (वय 23) असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता १० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाचा सविस्तर

धक्कादायक! सांगलीच्या बाजारात चक्क प्लास्टिकची अंडी; अन्न-औषध प्रशासनाची कारवाई
सांगली - प्लास्टिकची अंडी बाजारात आल्याची चर्चा काही महिन्यापासून सुरू असतानाच सांगलीच्या बाजारात नकली अंडी सापडली आहेत. त्यामुळे नकली अंड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बुधगावमध्ये एका दुकानात ही अंडी आढळली असून या प्रकरणी अन्न-औषध प्रशासनाने कारवाई करून प्लास्टिकची सर्व अंडी ताब्यात घेतली आहेत.वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details