महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज.. आत्ता.. रात्री १२ वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर..

ठाण्यामध्ये मनसे - भाजपच्या कार्यकर्त्यात राडा झाला, या घटनेत पोलिसांनी 50 जणांनी ताब्यात घेतले. हिमालय पूल दुर्घटना प्रकरणी 709 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. नांदेडमध्ये भाविकांच्या बोलेरोचा ब्रेक फेल झाल्याने गाडी उलटली्याने २२ जण जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्यावर केलेले आरोप खोटे निघाल्यास त्यांनी जनतेसमोर १०० उठाबशा काढाव्यात, असे वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. वैद्यकिय पदव्युत्तर प्रवेश नाकारण्यात आलेल्या मराठा विद्यार्थ्यांची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.

आज.. आत्ता.. रात्री १२ वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर..

By

Published : May 10, 2019, 12:00 AM IST

हिमालय पूल दुर्घटना; 709 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल
मुंबई - मुंबईतील सीएसएमटी स्थानकाजवळ कोसळलेल्या हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुरुवारी 709 पानांचे 83 साक्षीदार असलेले आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. 14 मार्चला हिमालय पूल कोसळल्याची दुर्घटना घडली होती. यात 7 जणांचा मृत्यू तर 31 जण जखमी झाले होते. वाचा सविस्तर..

नांदेडात भाविकांच्या बोलेरोचा ब्रेक फेल, पलटी झाल्याने २२ जण जखमी
नांदेड - श्री दत्तशिखर घाटात देवदर्शनाला जाणाऱ्या बोलेरो गाडीचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. यामध्ये गाडी उलटी झाल्याने ५ जण गंभीर तर १७ जण जखमी झाल्याची घटना सकाळी ९ वाजता घडली आहे. जखमींना यवतमाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. वाचा सविस्तर..

...तर मोदींनी जनतेसमोर १०० उठाबशा काढाव्यात - ममता बॅनर्जी
बांकुरा (पश्चिम बंगाल) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्यावर कोलमाफिया असल्याचे आरोप केले होते. हे खोटे निघाल्यास तुम्हाला जनतेसमोर १०० उठाबशा काढाव्या लागतील, असे वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. वाचा सविस्तर..

प्रवेश नाकारण्यात आलेल्या मराठा विद्यार्थ्यांची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी- मराठा क्रांती मोर्चा
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणानुसार दंत वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश नाकारले आहेत. त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समनव्यक विरेंद्र पवार यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या नावावर सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांची फसवणूक केली असल्याचे आणखी एक उदाहरण यामुळे समोर आल्याचे पवार यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर..

ABOUT THE AUTHOR

...view details