चेन्नईचा पराभव करत मुंबईची अंतिम फेरीत धडक, सूर्यकुमारची अर्धशतकी खेळी
आज.. आत्ता.. रात्री १२ वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर.. - bulletin
चेन्नईचा पराभव करत मुंबईने आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात गौप्यस्फोट केला. कर्जदार कुटुंबाला पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर येथीलशास्त्रीनगर येथे घडला. एमआरए मार्ग पोलिसांनी एका १२ वी पास डॉक्टरला अटक केली आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने सरबत, ऊसाचा रस आणि बर्फगोळा विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे.
चेन्नई -आयपीएलच्या 12 व्या मोसमातील 'क्वालिफायर-1' सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नईवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळविला. या विजयासह मुंबईच्या संघाने आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. वाचा सविस्तर..
राणेंना पक्षात ठेवल्यास मातोश्री सोडणार, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिली होती धमकी
मुंबई - नारायण राणे शिवसेनेत राहणार असतील तर मी मातोश्री सोडून जाईन अशी धमकी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिल्याचा गौप्यस्फोट स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांच्या आत्मचरित्रात करण्यात आला आहे. वाचा सविस्तर..
सावकाराचा कर्जदार कुटुंबाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न; एकजण गंभीर
चंद्रपूर - कर्जदार कुटुंबाला पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार शास्त्रीनगर येथे घडला. यात कर्जदार व त्याचा मुलगा जखमी झाला असून कर्जदाराच्या पत्नीची प्रकृती गंभीर आहे. या थरारक घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सोनू सरदार असे अवैध सावकारी करणाऱ्याचे नाव आहे. वाचा सविस्तर..
मुंबईचा 'मुन्नाभाई' गजाआड
मुंबई - एमआरए मार्ग पोलिसांनी एका १२ वी पास डॉक्टरला अटक केली आहे. मुंबईतील बांद्रा परिसरात गेली १५ वर्षे स्वतःचा दवाखाना उघडून रुग्णांच्या जीवाशी तो खेळत होता. मात्र, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ मेडिसिनच्या कार्यालयात बोगस रजिस्ट्रेशन नंबर देऊन प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रयत्नात या डॉक्टरचे बिंग फुटल्याने एमआरए पोलिसांनी त्याला अटक केली आहे. वाचा सविस्तर..
मुंबईकरांनो सावधान...! सरबत, बर्फाचे ८१ टक्के नमुने दूषित
मुंबई - कुर्ला रेल्वे स्थानकात दूषित सरबत विकत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यावर महापालिका प्रशासनाने सरबत, ऊसाचा रस आणि बर्फगोळा विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. वाचा सविस्तर..