मुंबई:दाऊद इब्राहिम च्या संबंधित प्रकरणाचा तपास केंद्रीय गृहमंत्रालयाने एनआयए कडे सोपवला होता. त्यानंतर मुंबई ईडी आणि एनआयएनने संयुक्त कारवाई करत अनेक ठिकाणी छापेमारी केली. या दरम्यान अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रुटला ताब्यात घेतले होते. त्यानंतर सलीम आणि इक्बाल कासकरच्या जवाबावरुन ईडीने मंत्री नवाब मलिक यांच्यावर अटकेची कारवाई केली. मलिक यांच्यावर दाऊदची बहीण हसीना पारकर कडून कुर्ला येथील जमीन विकत घेतल्याचा आरोप आहे.
ईडीच्या अटकेत असलेले मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा साथीदार माहीम आणि हाजी अली दर्गाचे ट्रस्टी सुहैल खंडवानी याच्या माहिममधील घरावर एनआयएने छापा टाकला. खंडवानी हा टचवूड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक आहे. नवाब मलिकांचा मुलगा फराझ मलिका हाही या कंपनीत 2006 ते 2016 या काळात संचालक होता. टचवूड आणि कांडल्याची असोसिएट हायप्रेशर टेक्वॉलॉजी कंपनीने बीकेसी भागात 200 कोटींची जमीन खरेदी केली आहे.
Nawab Malik in trouble : एनआयएची छापेमारी; नबाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Underworld don Dawood Ibrahim)च्या संबंधितांविरोधात एनआयए मुंबईने सोमवारी छापेमारी (NIA raid) करत अनेकांना ताब्यात घेतले. यामुळे मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता (Nawab Malik's troubles likely to escalate) आहे. मलिक यांचे व्यवसायिक भागीदार सुहैल खंडवानी (Suhail Khandwani) यांची देखील चौकशी झाली आहे.
एनआयए कडून मुंबईत टाकण्यात आलेल्या छापेमारी मध्ये 15 लोकांना आज पुन्हा चौकशीसाठी एनआयए कार्यालयात बोलवले आहे. सोमवारी एकाही व्यक्तीला अटक करण्यात आली नाही आहे. सलीम फ्रुट आणि सुहेल खंडवानी यांच्या आज देखील चौकशी होणार आहे. ईडीच्या अटकेत असलेले नवाब मलिक यांच्या डोक्यावर एनआयए ची चौकशीची टांगती तलवार असल्याने नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मंत्री नवाब मलिक यांनी मागील आठवड्यात खाजगी रुग्णालयात उपचाराकरता परवानगी देण्यात यावी याकरिता अर्ज केला होता या अर्जावर न्यायालयासमोर सुनावणी सुरू असताना मलिक यांनी केंद्रीय यंत्रणा तसेच ईडीवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मलिक यांच्या विरोधात पुन्हा केंद्रीय यंत्रणा सक्रिय झाल्या असून मुंबईत सोमवारी एनआयए धाडसत्र सुरू केल्याने नवाब मलिक यांना अडचणीत आणण्यासाठी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दाऊद इब्राहीमशी संबंधित प्रकरणाचातपास केंद्रीय गृह मंत्रालयाने फेब्रुवारी 2022 मध्ये एनआयएकडे सोपवला होता. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे डी कंपनी आणि दाऊद इब्राहीम भारतात टेरर फंडिंग, नार्को टेरर, ड्रग्ज स्मगलिंग आणि बनावट चलनाचा वापर करण्याचे काम करतो. दाऊद आणि डी-कंपनी लश्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि अल कायदा यांच्या माध्यमातून भारतात अतिरेकी कायवाया करत असल्याचेही गृह मंत्रालयाचे म्हणणं आहे. एनआयए छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन, इकबाल मिर्ची, दाऊदची बहीण हसीना पारकर यांच्याशी संबंधित तपास करणार आहे.
एएनआय इकबाल कासकरच्या ताबाघेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळात आहे. यासंदर्भात एनआयए अधिकाऱ्यांकडून मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टामध्ये अर्ज करण्यात येणार आहे. तशी परवानगी मिळाल्यानंतर एनआयए अधिकार भिवंडी न्यायालयातून इक्बाल कासकर चा ताबा घेण्याची परवानगी मिळाली तर एनआयए ठाण्यातील कारागृहातून ताबा घेईल. नंतर त्याला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात हजर करण्यात येईल.