मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी ( Businessman Mukesh Amban ) यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलियाबाहेर ( Antilia residence of industrialist Mukesh Ambani ) सापडलेले स्फोटक ( Antilia Explosive Case ) प्रकरणी आज सुनावणी झाली. मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणातील ( Mansukh Hiren murder case ) यावेळी एन्काऊंटर स्पेशलिस्ट आरोपी प्रदीप शर्मा ( Encounter Specialist Pradeep Sharma ) यांच्या जामीन अर्जावर त्यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तीवाद केला.
एनआयएला सीडीआर सादर करण्याचे निर्देश -आज झालेल्या सुनावणी दरम्यान, 17 फेब्रुवारी 2021 ला सायंकाळी 8 वाजता सचिन वाझे, प्रदीप शर्मा यांच्यात कथित भेट विक्रोळीत झाल्याचा एनआयएच्या आरोप पत्रात उल्लेख केला होता. या विरोधात आज प्रदीप शर्मा यांचे वकील आबाद पोंडा यांनी कोर्टात सीडीआर सादर केला आहे. यामध्ये प्रदीप शर्मा यांचे लोकेशन, तसेच सचिन वझे यांच्या लोकेशनमध्ये खूप अंतर असल्याचे शर्मा यांच्या वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाने कोर्टाने एनआयएला सीडीआर सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
NIA च्या दाव्यात तथ्थ नाही - प्रदीप शर्मा यांचे वकील आबाद पोंडा यांनी सादर केलेल्या फोन लोकेशन तसेच CDR चा खुलासा सादर करा असे निर्देश कोर्टाने NIA वकिलांना दिले. NIA नं सदर केलेला लोकेशन दाव्यात तथ्य नसल्याचं CDR मधून स्पष्ट होत आहे असे आबाद पोंडा यांनी म्हटले आहे.
अटर्नी जनरल अनिल सिंह यांचा युक्तिवाद
- सचिन वाझे आणी प्रदीप शर्मा यात 17 फेब्रुवारी 2021 ला भेट झाल्याचा NIA चा दावा
- सचिन वाझे आणी प्रदीप शर्मा यांचे विक्रोळीत एकाचवेळी फोन लोकेशन असल्याचा केला दावा
- CDR पुरावा केला सादर
- या आधी प्रदीप शर्मा यांचं फोन लोकेशन माझगाव डॉक परिसरात
स्कोर्पियोचा स्थळपुरावा अनिल सिंह यांनी केला सादर
- 17,18 आणी 25 ला विक्रोळी आणी कार मायकल रोडवर एकाच स्कोर्पियोचं लोकेशन