महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime News: मुंबईत बनावट नोटांचे सत्र सुरूच; डी गॅंगच्या संपर्कात असलेल्या फयाजला एनआयएकडून अटक - अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहीम

डी गॅंगच्या संपर्कात असलेल्या फयाज शिकीलकरला एनआयएकडून अटक करण्यात आली आहे. बनावट नोटांच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Mumbai Crime News
फयाज शिकीलकर

By

Published : May 14, 2023, 10:05 AM IST

मुंबई :दिवसेंदिवस मुंबईतील गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. बनावट नोटा, अमली पदार्थांची तस्करी याचे प्रमाण वाढत चालले आहे. नुकतेच बनावट नोटांच्या प्रकरणातकुख्यात मोस्ट वाॅन्टेड अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहीम याच्या डी गॅंगच्या संपर्कात असलेल्या फयाज शिकीलकर (३३) याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बेड्या ठोकल्या आहेत. भारतात बनावट नोटा वितरीत करण्याच्या रॅकेटमागे डी कनेक्शन आहे, असे समजल्यानंतर एनआयएने ही कारवाई केली आहे. ठाणे पोलिसांनी १८ नोव्हेंबर २०२१ रोजी उच्चप्रतीच्या बनावट नोटांच्या तस्करीचा पर्दाफाश करत २.९८ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या.

मुंबईत सहा ठिकाणी छापेमारी : ठाणे पोलिसांनी मुंबईतील वांद्रे येथील रहिवासी रियाझ अब्दुल रहमान शिखलीकर आणि नसीर चाैधरी या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. गुन्ह्यात डी गॅंग कनेक्शन असल्याने एनआयएने हे प्रकरण तपासासाठी घेत ०७ फेब्रुवारी २०२३ रोजी यात गुन्हा दाखल केला. एनआयएच्या पथकांनी याप्रकरणात बुधवारी मुंबईत सहा ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत एनआयएच्या पथकांनी १२ तलवारी, डिजिटल उपकरणे आणि महत्वाची कागदपत्रे जप्त केली.

डी गॅंगचा 'या' गुन्ह्यामागे हात : रॅकेटशी संबंधित आरोपी डी-कंपनीशी संपर्क साधत होते. यात फयाज हा सुद्धा डी गॅंगच्या संपर्कात असल्याने एनआयएने त्याला ताब्यात घेतले, त्याच्या कसून चौकशीअंती त्याला अटक केली आहे. फयाज याच्या अटकेने या गुन्ह्यातील अटक आरोपींची संख्या तीन झाली आहे.कुख्यात मोस्ट वाॅन्टेड अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहीम याच्या डी गॅंगचा या गुन्ह्यामागे हात आहे. या प्रकरणात एनआयएने कारवाईमध्ये १२ तलवारी देखील जप्त केल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details