महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bullet train project : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे पुढचे पाऊल, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन साठी साबरमतीला होणार वर्कशॉप आणि डेपो - Mumbai Ahmedabad Bullet Train

मुंबई अहमदाबाद रेल्वे मार्गासाठी नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनने जपानची सुजित्झ कॉर्पोरेशन (Sujitz Corporation of Japan) आणि एल अँड टी यांच्यासोबत आज नवा (Signed a new contract with L and T today) करार केला. या करारानुसार मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन (next step of the bullet train project) रेल्वे मार्गाच्या संदर्भात साबरमती येथे रोलिंग स्टॉक वर्कशॉप व डेपोचे बांधकाम केले जाईल. या रोलिंग स्टॉक वर्कशॉप मध्ये बुलेट ट्रेनची चाचणी तपासणी विविध देखभाल सुविधा केल्या जातील. (Mumbai Ahmedabad Bullet Train)

Bullet train project
बुलेट ट्रेन प्रकल्पाचे पुढचे पाऊल

By

Published : Dec 22, 2022, 9:15 PM IST

मुंबई :बुलेट ट्रेनचे गुजरात मध्ये 29 टक्के काम पूर्ण झालेले आहे तर महाराष्ट्रामध्ये 23 टक्के एकूण काम पूर्ण झालेले आहे. तसेच एकूण भूसंपादन महाराष्ट्रामध्ये आणि गुजरात मध्ये 98 टक्के झालेला आहे .आता त्या पुढचा टप्पा म्हणजे बुलेट ट्रेनच्या ज्या गाड्या आहेत, त्यासाठी मोठे वर्कशॉप आणि डेपो जरुरी आहे. यासंदर्भात राष्ट्रीय गटिशक्ती रेल्वे महामंडळाने भारतातील प्रख्यात लार्सन अँड टुब्रो तसेच जपान मधील सुजित कॉर्पोरेशन यांच्यासोबत करार केलेला आहे. या करारानुसार छोटा वर्कशॉप बुलेट ट्रेनची नियमित तपासणी विविध छोट्या-मोठ्या इमारती बुलेट ट्रेनची देखभाल, त्यांची तांत्रिक तपासणी या सगळ्याचा समावेश या डेपोमध्ये आहे. (Mumbai Ahmedabad Bullet Train)

बुलेट ट्रेन प्रकल्पाचे पुढचे पाऊल



मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन साठी साबरमतीला होणार वर्कशॉप आणि डेपो :या वर्कशॉप आणि डेपोच्या संदर्भात जापान मधील सेनदायी आणि कांझावा सिंग येथील शिक्षण यांनी सुरू केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी केला जाईल. रोलिंग स्टॉकची तपासणी जी दररोज करायला हवी, त्याची देखरेख या ठिकाणी होईल. बुलेट ट्रेनच्या संदर्भात जे काम सुरू आहे, त्यासाठी लागणाऱ्या 250 प्रकारच्या छोट्या मशिनरी या ठिकाणी ठेवल्या जातील. तसेच मोठ्या आणि मध्यम आकाराच्या 800 पेक्षा अधिक मशीन या डेपोमध्ये ठेवल्या जातील. जपानमधून या खरेदी केल्या जाणार आहेत.

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन साठी साबरमतीला होणार वर्कशॉप आणि डेपो



साबरमतीला तयार केला जाणारा डेपो हा असा असेल :साबरमती या ठिकाणी मुंबई अहमदाबाद या रेल्वे मार्गाचा रेल्वे डेपो केला जाईल. यामध्ये सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण केले जाणार आहे. डेपोमध्ये हवा खेळती राहावी यासाठी विशिष्ट व्यवस्था केल्या जातील. या डेपोमध्ये धुळीपासून बचाव होण्यासाठी विशेष प्रकारच्या जाळ्या लावल्या जातील. पावसाचे पाणी या डेपोमध्ये येऊ नये त्यासाठीची विशेष व्यवस्था केली जाणार आहे. तसेच एलईडी दिव्यांच्या आधारित कृत्रिम प्रकाश प्रणाली या ठिकाणी वापरण्यात येईल. त्याच्याशिवाय नैसर्गिक प्रकाश देखील या डेपोमध्ये कसा येईल, याबाबत विशेष तंत्रज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची व्यवस्था केली जाईल. याशिवाय नैसर्गिक प्रकाश येण्यासाठी सौरऊर्जेचा देखील उपयोग केला जाईल.

एल अँड टी यांच्यासोबत आज नवा करार


डेपोच्या गच्चीचा देखील केला जाणार उपयोग :साबरमती येथे होणाऱ्या या डेपोच्या गच्चीवर महत्त्वाच्या काही व्यवस्था आणि प्रणाली बुलेट ट्रेन संदर्भात उभ्या केल्या जाणार आहेत. यामध्ये बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टीम असेल. माहिती आणि तंत्रज्ञान सूचना यांची देवाणघेवाण करणारी प्रणाली असेल. आग प्रतिबंधात्मक प्रणाली, सावधानता आणि धोक्याचे इशारे देणारी व्यवस्था असेल. एक्सेस कंट्रोल सिस्टीम या सर्व अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असे हे कारशेड डेपो साबरमती या ठिकाणी तयार केले जाणार आहे.


राष्ट्रीय गतिशक्ति रेल्वे महामंडळ भूमिका :या कराराच्या संदर्भात राष्ट्रीय गतिशक्ती रेल्वे महामंडळाच्या प्रवक्त्या सुषमा गौर यांच्यासोबत ईटीव्ही भारत वतीने संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, हा नवीन करार केला गेला आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनी जपान येथील सुजित्झ कॉर्पोरेशन कंपनी यांच्या संयुक्त नेतृत्वात साबरमती डेपोचे डिझाईन आणि बांधकाम याबाबत हा करार आहे. या कराराच्या प्रसंगी व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र प्रसाद आणि इतर अधिकारी उपस्थित होते. साबरमती या ठिकाणी हा डेपो लवकरच तयार होईल आणि ट्रेनची देखभाल दुरुस्त्या इतर तांत्रिक आणि यांत्रिक कामे या ठिकाणी केली जातील.

ABOUT THE AUTHOR

...view details