मुंबई- बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्राचे वितरण आणि विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून ही बंदी असणार आहे. वृत्तपत्र वितरण करताना वृत्तपत्र विक्रेते, डेपोधारक, वृत्तपत्र समूहाचे पदाधिकारी, वृत्तपत्र टाकणारी मुले ही सर्व सहभागी असतात. या सर्वांची सुरक्षितता लक्षात घेता सभोवतालची परिस्थिती आरोग्यास अनुकूल होईपर्यंत नाईलाजास्तव वितरण थांबवण्यात येत आहे, असे बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाने एका परित्रकाद्वारे माहिती दिली.
COVID-19: मुंबई, ठाण्यात आजपासून वृत्तपत्र बंद... - मुंबई बातमी
कोरोनाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र येत्या ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली. तसेच मुंबईतील रेल्वे, खाजगी बसेस एसटी सेवा बंद केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई ठाण्यात वृत्तपत्र न विकण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
हेही वाचा-कोरोना अपडेट : राज्यात पहाटे पाच वाजेपर्यंत जनता कर्फ्यू वाढवला - आरोग्यमंत्री
कोरोनाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र येत्या ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली. तसेच मुंबईतील रेल्वे, खाजगी बसेस एसटी सेवा बंद केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई ठाण्यात वृत्तपत्र न विकण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्यातील नागरिकांना ३१ मार्चपर्यंत वृत्तपत्र मिळणार नाहीत.