मुंबई -शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाख रुपयेपर्यंतच्या कर्जासाठी 0 टक्के दराने व्याज आकारणी केली जाणार आहे. 1 लाख ते 3 लाख रुपयांच्या कर्जमर्यादेत विहित मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास सध्याच्या 1 टक्के व्याजदरात आणखी 2 टक्के व्याज दर सवलत मिळणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 3 लाखापर्यंतचे पीक कर्ज 0 टक्के व्याज दराने देण्याची घोषणा केली होती.
शून्य टक्के व्याज दराचे गणित
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये विहित मुदतीत अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत देण्यात येते. योजनेत विहित मुदतीत अल्पमुदत पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत 3 टक्के व्याज सवलत 1 लाख ते 3 लाख रुपये या कर्ज मर्यादेपर्यंत 1 टक्का व्याज दरात सवलत देण्यात येत होती. आता 1 ते 3 लाख रुपये या कर्ज मर्यादेमध्ये शेतकऱ्यांनी अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीमध्ये केल्यास त्यांना अधिक 2 टक्के व्याज दरात सवलत देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे.
केंद्र सरकारचीही 3 टक्के व्याज सवलत