महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 1, 2020, 2:17 AM IST

ETV Bharat / state

नववर्ष स्वागत : मुंबईत वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

नवीन वर्षाच्या जल्लोष करण्यासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता काही युवक आणि हुल्लडबाजी करणारे वाहन चालक रस्त्यावरील इतरांच्या जीवास धोका निर्माण करतात. यासाठी मुंबई पोलीस आणि वाहतूक शाखा सज्ज झाल्या आहेत.

new year mumbai traffic police news
नववर्ष स्वागत : मुंबईत वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

मुंबई - 2019 हे वर्ष संपाले आणि काही वेळापूर्वीच 2020 वर्षाला सुरूवात झाली. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईसह सर्वच जण सज्ज झाली होती. नववर्षाच्या स्वागतासाठी काही तरुण रस्त्यावर हुल्लडबाजी, स्टंटबाजी करतात. तर काही जण मद्यपान करून वाहन चालवतात. वाहतूक पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी मद्यपान न करणाऱ्या वाहनचालकांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. तर दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई केली आहे.

नववर्ष स्वागत : मुंबईत वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

नवीन वर्षाच्या जल्लोष करण्यासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता काही युवक आणि हुल्लडबाजी करणारे वाहन चालक रस्त्यावरील इतरांच्या जीवास धोका निर्माण करतात. यासाठी मुंबई पोलीस आणि वाहतूक शाखा सज्ज झाल्या आहेत. याकरिता पूर्व उपनगरात महामार्गावर सायन, सुमन नगर मानखुर्द, मुलुंड याठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. माटुंगा वाहतूक पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली. मद्यपान केलेल्यां वाहनचालंकावर कारवाई केली. तर जे मद्यपान करत नाहीत त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन गुलाब पुष्प दिले.

हेही वाचा - नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर जमले चौपाटी अन् मरीन ड्राईव्हवर..

ABOUT THE AUTHOR

...view details