मुंबई : मुंबईत आज(गुरुवार) कोरोनाचे 1 हजार 223 नवे रुग्ण आढळून आले असून 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोना ग्रस्तांचा आकडा 1 लाख 13 हजार 187 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 6 हजार 297 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1 हजार 58 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 86 हजार 385 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सध्या मुंबईत 20 हजार 211 सक्रिय रुग्ण आहेत. तर, मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 76 टक्क्यांवर पोहचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 75 दिवसांवर पोहचला आहे.
मुंबईत कोरोनाचे 1,223 नवे रुग्ण, 53 मृत्यू; बाधितांचा आकडा 1,13,187 वर - मुंबई कोरोना अपडेट्स
मुंबईत आज कोरोनाच्या 1 हजार 223 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली तर 53 जणांचा मृत्यू झाला. मुंबईतून आज 1 हजार 58 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 86 हजार 385 वर पोहचला आहे. तर, 6 हजार 297 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 20 हजार 211 सक्रिय रुग्ण आहेत.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 53 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 40 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 35 पुरुष तर 18 महिला रुग्ण आहेत. मुंबईतून आज 1 हजार 58 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 86 हजार 385 वर पोहचला आहे. मुंबईत कोरोनाचे 1 लाख 13 हजार 187 रुग्ण असून 86 हजार 385 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 6 हजार 297 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 20 हजार 211 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 75 दिवस तर सरासरी दर 0.93 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 616 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 6 हजार 173 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 5 लाख 16 हजार 714 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.