महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 7 हजार नवे रुग्ण; 92 जणांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना आकडेवारी

राज्यात आज (9 फेब्रुवारी) 7 हजार 142 नव्या कोरोना रुग्णांची नोंद (New Corona Cases in Maharashtra) झाली आहे. तर, 92 जणांचा मृत्यू झाला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वीस हजाराच्या आसपास असून, सक्रिय रुग्णांची संख्या देखील घटली आहे.

file photo
फाईल फोटो

By

Published : Feb 9, 2022, 8:15 PM IST

Updated : Feb 9, 2022, 8:38 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या आटोक्यात (Corona Cases Control) येत असताना आज किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील दोन दिवस सहा हजार रुग्ण आढळून आले होते. मात्र, आज (9 फेब्रुवारी) 7 हजार 142 नव्या रुग्णांची नोंद (New Corona Cases in Maharashtra) झाली आहे. तर, 92 जणांचा मृत्यू झाला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वीस हजाराच्या आसपास असून, सक्रिय रुग्णांची संख्या देखील घटली आहे.

  • राज्यात 82 हजार 893 कोरोना सक्रिय रुग्ण -

एकीकडे कोरोनाची रुग्ण संख्या घटत असताना दुसरीकडे रुग्ण संख्येत किंचित वाढ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असले तरी मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. आज 7 हजार 142 नव्या रुग्ण आढळून आले. त्यापैकी 92 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.83 टक्के इतके आहे. 20 हजार 222 इतके रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या 75 लाख 93 हजार 291 इतकी आहे. हे प्रमाण 97.07 टक्के इतके आहे. 7 कोटी 59 लाख 5 हजार 676 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 10.31 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 23 हजार 385 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 78 हजार 76 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2396 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 82 हजार 893 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

  • ओमायक्रॉनचा मागील आठवड्यापासून एकही नवा रुग्ण नाही -

राज्यात ओमायक्रॉनचा मागील आठवड्यापासून एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. आजपर्यंत 3 हजार 334 एवढे रुग्ण बाधित झाले आहेत. तर 2189 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 7452 जणांची जनुकीय चाचणी केली. 7014 चाचण्याचे अहवाल प्राप्त झाले असून 438 नमुने प्रलंबित आहेत.

  • विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -

मुंबई महापालिका - 441

ठाणे - 29

ठाणे मनपा - 73

नवी मुंबई पालिका - 188

कल्याण डोबिवली पालिका - 34

मीरा भाईंदर - 23

वसई विरार पालिका - 16

नाशिक - 132

नाशिक पालिका - 157

अहमदनगर - 333

अहमदनगर पालिका - 90

पुणे - 413

पुणे पालिका - 1185

पिंपरी चिंचवड पालिका - 400

सातारा - 195

नागपूर मनपा - 364

Last Updated : Feb 9, 2022, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details