मुंबई- बुधवारी राज्य परिवहन प्राधिकरणाने (आरटीओने) बेस्ट बसभाडे कपातीच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. त्यामुळे येत्या आठवड्यात नवीन भाडेदर लागू होतील, अशी माहिती बेस्टकडून देण्यात आली.
बेस्ट बसभाडे कपातीच्या प्रस्तावाला आरटीओची मंजूरी
बेस्ट बस भाड्याच्या सुसूत्रीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला असून अधिसूचना येण्यासाठी व आणखी काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागणार आहेत.
बेस्टचे उत्पन्न वाढावे यासाठी बेस्ट उपक्रमाने नवीन भाडेदराचा प्रस्ताव तयार केला होता. त्याला बेस्ट समिती व मुंबई पालिकेकडून मंजुरी मिळाली. त्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला होता. बेस्ट बस भाड्याच्या सुसूत्रीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला असून अधिसूचना येण्यासाठी व आणखी काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागणार आहे. त्यानंतर त्वरित भाडेकपातीची अंमलबजावणी केली जाईल, असे बेस्टच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले आहे.
नवीन प्रस्तावानुसार पाच किलोमीटर अंतरासाठी किमान भाडे ५ रुपये तर वातानुकूलित बसचेही किमान भाडे ६ रुपये असेल.