महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत आज 728 जणांना कोरोना, 28 मृत्यू - mumbai 7 june corona cases

मुंबईत आज 728 नवे रुग्ण आढळले. आज 28 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 980 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईची कोरोना रुग्णसंख्या 7 लाख 12 हजार 329 वर पोहोचली आहे.

mumbai
mumbai

By

Published : Jun 7, 2021, 9:02 PM IST

मुंबई - मुंबईत गेले काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. गेल्या रविवारी (31 मे) 676 रुग्ण आढळून आले होते. त्यात काहीशी वाढ पाहायला मिळत आहे. मुंबईत आज (7 जून) 728 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज 28 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 980 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, रुग्ण दुप्पटीचा कालावधी 550 दिवसांवर पोहोचला आहे.

मुंबईची एकूण रुग्णसंख्या

मुंबईत आज 728 रुग्ण आढळून आले. यामुळे मुंईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 12 हजार 329 वर पोहोचला आहे. आज 28 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 066 वर पोहोचला आहे. 980 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 79 हजार 258 वर पोहोचली आहे.

मुंबईत आज 28 हजार 76 चाचण्या

मुंबईत सध्या 15 हजार 783 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के आहे. तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी 550 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 26 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर 96 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. मुंबईत आज 28 हजार 76, तर आतापर्यंत एकूण 64 लाख 53 हजार 499 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

रुग्णसंख्येत चढ-उतार

1 मे - 3908

2 मे - 3672

3 मे - 2662

4 मे - 2554

5 मे 3879

6 मे - 3056

7 मे - 3039

8 मे - 2678

9 मे - 2403

10 मे - 1794

11 मे - 1717

12 मे - 2116

13 मे - 1946.

14 मे - 1657

15 मे - 1447

16 मे - 1544

17 मे - 1240

18 मे - 953

19 मे - 1350

20 मे - 1425

21 मे - 1416

22 मे - 1299

23 मे - 1431

24 मे - 1057

25 मे - 1037

26 मे - 1362

27 मे - 1266

28 मे - 929

29 मे - 1048

30 मे - 1066

31 मे - 676

1 जून - 831

2 जूनला 925

3 जून - 961

4 जून - 973

5 जून - 866

6 जून - 794

7 जून - 728

हेही वाचा -Pune Fire LIVE Updates: पिरंगुट एमआयडीसीतील कंपनीला लागलेली आग आटोक्यात; कुलिंगचे काम सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details