महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CSMT पूल दुर्घटना: स्ट्रकचरल ऑडिटर नीरजकुमार देसाईला अटक - ARESTRED

CSMT पुल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी स्ट्रकचरल ऑडिटर नीरज कुमार देसाई यास अटक केली आहे.

स्ट्रकचरल ऑडिटर नीरजकुमार देसाईला अटक

By

Published : Mar 18, 2019, 8:43 PM IST

Updated : Mar 18, 2019, 10:10 PM IST

मुंबई- छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जण मृत्युमुखी पडले होत, तर ३१ जण जखमी झाले होते. या दुर्घटनेप्रकरणी चुकीचा स्ट्रक्चरल अहवाल दिल्याचा ठपका असलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई याला अटक करण्यात आली आहे. सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

स्ट्रकचरल ऑडिटर नीरजकुमार देसाईला अटक

एक्स्पर्ट असूनदेखील ऑडिट करणाऱ्यांनी निष्कळजीपणा दाखवला म्हणून नीरजकुमार देसाईवर मनुष्यबद्धचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑडिट करणाऱ्या व्यक्तीने जाणूनबुजून निष्काळजीपणा दाखवला त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अटक केलेला आरोपी नीरजकुमार देसाई हा ME मधून शिक्षित असून त्यानेच या पुलाचे ऑडिट केले होते. पोलिसांनी या प्रकरणी जखमी लोकांच्या आणि मृतांच्या नातेवाईकांचे जबाब घेतले आहेत. या प्रकरणी मुंबई महानगरपालिकेचेअधिकारी संजय दराडे यांचीदेखील चौकशी झाली आहे. काही पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या चौकशी देखील करण्यात आलेल्या आहेत.

मुंबई महापालिकेनेही याअगोदर कारवाई केली होती. पूल दुर्घटनेप्रकरणी संबधित अभियंत्यांना तातडीने निलंबित करण्यात आले होते तर निवृत्त अभियंत्यांची चौकशी केली जाणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिटचा चुकीचा अहवाल देणाऱ्या देसाई कन्सल्टन्सला काळ्या यादीत टाकले आहे. तर कंत्राटदार आरपीएस कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.

Last Updated : Mar 18, 2019, 10:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details