महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऑनर किलिंग रोखण्यासाठी कडक कायदा करावा; नीलम गोऱ्हे यांची मागणी

नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. यात ऑनर किलिंगच्या घटनांची योग्य चौकशी करून संबंधितांना कडक शासन होईल याकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.

By

Published : May 9, 2019, 10:34 PM IST

शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे

मुंबई - राज्यात गेल्या दोन वर्षात ऑनर किलिंगाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणारे नाही, अशा घटना रोखण्यासाठी राज्यात कडक कायदा करावा, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेतील प्रतोद नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. यासंदर्भात गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहले आहे.

गोऱ्हे यांनी लिहिलेल्या पत्रात नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातल्या निघोज गावी झालेल्या घटनेचा उल्लेख केला आहे. मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे मुलीच्या कुटुंबियांना समाजात आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी नवविवाहितेला आणि पतीला जाळून टाकले, अशा घटना महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला शोभणाऱ्या नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी राज्यात घडलेल्या अनेक ऑनर किलिंगाच्या घटनांचा आढावा ही या पत्रात घेतला आहे.

या पत्रात गोऱ्हे यांनी निवेदनही मुख्यमंत्र्यांना सादर केले असून ऑनर किलिंगच्या घटनांची योग्य चौकशी करून संबंधितांना कडक शासन होईल याकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.

पत्रातील निवेदन....

१. समाजातील लोकांमध्ये प्रबोधन घडवायचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
२. समाजात हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी सरकारने या विषयी कायदा करण्यात यावा
३. बीड जिल्ह्यातील ऑनर किलिंगच्या घटनेत सुमीत शिवाजीराव वाघमारे याची हत्या करण्यात आली होती. पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून यातील दोन आरोपींना जमीन मिळाला आहे. मृत सुमित यांची पत्नी हिच्या जीवितास धोका निर्माण झाल्याबाबत तिने मला दूरध्वनीवरून कळविले आहे. या घटनेत आरोपीची जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांना सूचना देण्यात याव्यात.
४. मंगळवेढ्यातील सलगरमध्ये अनुराधा बिराजदार या डॉक्टर मुलीने श्रीशैल्य बिराजदार यांच्याशी घरच्यांच्या विरुद्ध विवाह केले म्हणून अनुराधा हिच्या आई वडिलांनी हत्या केली. तर दुसऱ्याच दिवशी अनुराधा यांचे पती श्रीशैल्य याचा देखील खून झाला. याबाबत अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती आहे. या घटनेतील आरोपींना देखील अटक करून कडक कारवाई करण्यात यावी.
५. पुणे येथे हिंजवडी येथे ही काल ऑनर किलिंगतुन तुषार पिसाळ यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. याघटनेची चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी.

ABOUT THE AUTHOR

...view details