महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाकरे सरकार ॲक्सिस बँकेला देणार धक्का.. पोलिसांची खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळविण्याची मागणी

राज्यातील सत्ता बदलाचा फटका अ‌ॅक्सिक्स बँकेला बसणार असल्याची शक्यता असून ठाकरे सरकारला पोलिसांची पगारी खाती राष्ट्रीयीकृत बँकेत वर्ग करायची आहेत. या महिन्यातच मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही खाती वर्ग केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नवाब मलिक
नवाब मलिक

By

Published : Dec 25, 2019, 9:44 PM IST

Updated : Dec 25, 2019, 11:19 PM IST

मुंबई - राज्यातील पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची खासगी क्षेत्रातील अ‌ॅक्सिस बँकेतील पगाराची खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्यात यावी, अशी चर्चा जोर धरत आहे. आता नवीन सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा प्रवक्ते नवाब मलिक यांनीही खाते बदलण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

हेही वाचा -महाविकास आघाडीचे सरकार फसवे नाही, जे बोलते ते करते- नवाब मलिक

राज्यातील सत्ता बदलाचा फटका अ‌ॅक्सिक्स बँकेला बसणार असल्याची शक्यता असून ठाकरे सरकारला पोलिसांची पगारी खाती राष्ट्रीयीकृत बँकेत वर्ग करायची आहेत. या महिन्यातच मंत्रीमंडळ विस्तारानंतर ही खाती वर्ग केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यभरातील 2 लाखांपेक्षा जास्त पोलिसांची खाती ॲक्सिस बँकेत असून पोलिसांच्या या खात्यातून अ‌ॅक्सिस बँकेत वर्षाला 11 हजार कोटींची उलाढाल होते. मात्र, हे पोलीस खातेदार अ‌ॅक्सिस बँकेला आता गमवावे लागू शकतात.

हेही वाचा -'एनपीआर' सांगेल, मराठी मुला-मुलींचा रोजगार हिरावतंय कोण?

विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अ‌ॅक्सिस बँकेत उप-संचालक पदावर कार्यरत आहेत. देवेंद्र फडणीस यांच्या सरकारने पोलिसांची, अंगणवाडी सेविकांची खाती ॲक्सिस बँकेला जोडली आहेत. अमृता फडणवीस या बँकेत कार्यरत असल्याने ही खाती का जोडण्यात आली, ती राष्ट्रीय बँकेमध्ये जोडण्यात यावीत, ही खाती अगोदरच राष्ट्रीयीकृत बँकेत होती. मात्र, मागच्या सरकारने ही ॲक्सिस बँकेत वर्ग केली होती, ती बदलण्याची मागणी वारंवार आम्ही करतच होतो, ही आमची जुनीच मागणी असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

नवाब मलिक
Last Updated : Dec 25, 2019, 11:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details