मुंबई:पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना तब्बल नऊ वर्षे झाली आहे. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. यावर राकॉंचे सुरज चव्हान यांनी मोदींवर निशाना साधला आहे. पंतप्रधान आपली केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे. नऊ वर्षांत काही आपण सिद्ध करू शकला नाही. निवडणुका जवळ आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची वाढलेली ताकद पाहून पंतप्रधानांना जुने दिवस आठवायला सुरुवात झाली आहे. त्यांना खुले आव्हान आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे. बारामती मधील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले होते की शरद पवारांचा बोट धरून मी राजकारणात आलो, आणि आज पवारांवर आरोप करीत आहात. अशा प्रकारच्या दुटप्पी धोरणामुळेच देशांमध्ये आपल्या विरोधात वातावरण तयार होत असल्याचा, आरोप राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण यांनी केला आहे.
शिंदे गटाचे मीटर बाहेर काढा:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या भाषणांमध्ये देशातील काही राजकीय पक्षांचे नाव घेतले आणि हे पक्ष घोटाळेबाज असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी म्हटल आहे की, त्यांनी एक मीटर बनवावा की ज्याच्यामुळे या देशातील घोटाळे लोकांसमोर येऊ शकतील. असाच विचार जर केला तर राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांनी घोटाळे केल्याचे त्यांच्याच पार्टीतले काही लोक सांगतात. आज आपण गप्प का? मग ते मीटर गेलं कुठं? त्या मीटरला सुद्धा बाहेर आणा. ज्यांनी घोटाळा केला त्यांच्यावर कारवाई करायचे आदेश द्यावे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमची मागणी आहे. पण शिंदे गटाचे आणि भाजपचे लोक ज्यांनी घोटाळ्यामुळे नावलौकिक मिळवले त्यांचे देखील मीटर बाहेर आणून जनतेसमोर ठेवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता क्लाईड क्रास्टो यांनी केले आहे.
राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा:संभाजी भिडे यांनी राष्ट्रगीत, तिरंगा ध्वज आणि स्वातंत्र्य दिनाचा अपमान केला असून हा राष्ट्रद्रोह आहे. त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा. अन्यथा कसा दाखल करून घ्यायचा हे काँग्रेस बघून घेईल, असा इशारा काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे. फडणवीस यांनाही मला सांगायचं आहे की, हे केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हतं. आपण कायद्याचा अभ्यास केलेला आहे. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक स्वातंत्र्याची नांदी सुरू होती. ज्यांना मनुस्मृतिप्रमाणे अधिकार नाकारले होते, ज्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी अशा मुस्लीम लीगसोबत युती केली त्यांनी 1940 साली वेगळ्या पाकिस्तानची मांडणी केली होती. तशी मांडणी सावरकरांनी केली होती. खरा इतिहास समोर येत आहे. संविधान मान्य नाही आणि मनुस्मृतीचे पुरस्कर्ते आहेत. संपूर्ण बहुजन समाजाने आणि स्त्री वर्गाने पायाखाली राहिली पाहिजे अशी आपली मानसिकता आहे. याचा निषेध करतो आणि लवकरात लवकर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे यांनी केली आहे.
हेही वाचा: