मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त ( Sharad Pawar 82nd birthday ) पक्षाकडून काल आणि आज असे दोन दिवस राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ( Sharad Pawar Birthday Events Organized ) आहे. शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटर येथून डिजिटल व्हर्च्युअल रॅली वाढदिवसानिमित्त करणार आहेत. त्या रॅलीच्या माध्यमातून आपल्या पक्षातील सर्व नेते कार्यकर्त्यांशी ते थेट संवाद ( Sharad Pawar Digital Virtual Rally ) साधतील. तसेच आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पक्षाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
शरद पवार यांचा अल्प परिचय : १२ डिसेंबर १९४० साली शरद पवार यांचा जन्म बारामतीत झाला. शरद पवार हे देशातील सर्वात जाणकार नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकीय कारकीर्द १९५६ साली विद्यार्थी नेता म्हणून सुरू झाली. त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. आणि त्यांची राजकारणात एन्ट्री झाली. त्याच काळात विद्यार्थी संघटनेच्या एका कार्यक्रमाला तात्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात शरद पवार भाषणामुळे मुख्यमंत्री देखील त्यांच्याकडून प्रभावीत झाले. त्यांना सक्रिय राजकारणात येण्यासाठी खुद्द यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले. यशवंतरावांच्या सांगण्यावरुनच पवारांनी पुढे युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 24 व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष ( Maharashtra Youth Congress President at 24 age ) झाले. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१ आणि १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे. अगदी वयाच्या २९ व्या वर्षी त्यांनी वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात ते सभाही झाले. काँग्रेसचे १२ आमदार फोडून शरद पवार पहिल्यांदा १९७८ ला मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी वसंतराव नाईक यांचे सरकार ( Sharad Pawar Political Career ) पाडले.