मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अजित पवारांनी सरकारला साथ देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सह्याद्रीवर पत्रकार परिषद घेऊन अधिकृत राष्ट्रवादी पक्ष म्हणून शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असल्यासच जाहीर केले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारला पाठिंबा नसल्याचे पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केल आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?काही आमदारांनी स्वतः मंत्री मंडळात जाण्याची भूमिका घेतली आहे. पक्षाची मान्यता न घेता शपथ घेतली आहे. पक्ष म्हणून विधानसभा गट नेता म्हणून मी सांगतो. विरोधीपक्ष नेते आणि प्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाड असणार आहेत. सत्तेत असताना विरोधी पक्षातील नेत्यांना फोडण्याचे काम पुन्हा एकदा झाले आहे. गेलेल्यांना अनेक आश्वासन दिली असल्याचे समजत आहे. योग्य वेळ आल्यानंतर बोलू, अशा प्रकारचा टोला जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत लगावला. पाच जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांची नेत्यांची बैठक वाय बी सेंटर येथे एक वाजेच्या दरम्यान आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते नियुक्ती
शपथविधीसाठी गेलेले अनेक आमदार संपर्कात-अनेक आमदारांनी माहीत नसतानाही सह्या केल्या आहेत. राजभवनात शपथविधीसाठी गेलेला अनेक आमदार आमच्या संपर्कात आहे. आम्ही शरद पवार यांच्या सोबत असल्याचे त्यांनी फोनवरून कळविले आहे. विरोधी पक्ष नेतेपद जागा रिक्त आहे. आमची संख्या जास्त असल्यामुळे जितेद्र आव्हाड यांची नियुक्ती केली आहे.
शपथ घेतलेल्या आमदारांवर तूर्तास कारवाई नाही -जे घर सोडून गेले त्यांना भाकरी द्यायचे कारण काय? अशा प्रकारचे मोठे विधान जयंत पाटील यांनी केलs आहे. मला ते एकत्र जमले माहिती होते. संख्या झाल्यावर तिकडून कधीतरी तिकडे जाणार हे माहिती होते. ज्या आमदारांनी आज शपथ घेतली. त्यावर कारवाई करण्याच्याबाबत तुर्तास विचार नाही. कायेदशीर सल्ला घेवू, अशी त्यांनी माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेते आणि प्रतोत पदाचे नावाचे पत्र दिले आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहीने जितेंद्र आव्हाड हे विधानसभा विरोधी पक्ष नेते आणि पक्षाचे विधानसभा मुख्य प्रतोत म्हणून काम पाहतील अशा प्रकारचे पत्र दिले आहे.
हेही वाचा-