महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2023, 7:33 AM IST

ETV Bharat / state

Mumbai Crime News : राष्ट्रवादीच्या आमदाराला टॅक्सीचालकाची जीवे मारण्याची धमकी, भररस्त्यात टॅक्सीतून उतरवलं

Mumbai Crime News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कोरमोरे यांना मुंबईतील एका टॅक्सी चालकानं जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी टॅक्सी चालकाला अटक केली आहे.

taxi
टॅक्सी

मुंबई Mumbai Crime News : मुंबईत एका टॅक्सी चालकानं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कोरमोरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कोरमोरे यांनी वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी आता टॅक्सी चालक इरफान अली (वय ३५) याला अटक केली आहे.

जीवे मारण्याची धमकी देत टॅक्सीतून उतरवलं : झालं असं की, भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कोरमोरे हे बुधवारी दिल्लीहून विमानानं मुंबईत आले. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर टॅक्सीनं ते कुलाबा येथील आमदार निवास येथं जाण्यास निघाले. वाटेत टॅक्सी चालक आणि आमदार कोरमोरे यांच्यात काही वाद झाला. तेव्हा टॅक्सी चालकानं त्यांना चक्क जीवे मारण्याची धमकी देत वाकोला जंक्शन येथं टॅक्सीतून खाली उतरण्यास सांगितलं. या प्रकरणी कोरमोरे यांनी वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर टॅक्सी चालकाला अटक करण्यात आल्याची माहिती वाकोला पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिली.

हेही वाचा:HC Grant Bail To Terror Accused : रिक्षाचालक दहशतवाद्याचा टेलरच्या घरात मुक्काम; अमेरिकेतून जमा झाले पैसे, मग...

टोलच्या पैशांवरून वाद झाला : आमदार राजू कोरमोरे विमानतळावर उतरल्यानंतर कुलाबातील आमदार निवास येथं टॅक्सीनं जाण्यास निघाले. कोरमोरे यांनी टॅक्सी चालकाला टॅक्सी वांद्रे-वरळी सी लिंक वरून नेण्यास सांगितली. त्यावेळी सी लिंकच्या टोलचे पैसे कोण भरणार? यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर टॅक्सी चालकानं राजू कोरमोरे यांना जीवे मारण्याची धमकी देत दिली आणि टॅक्सीतून खाली उतरवलं. ही घटना ६ सप्टेंबर, बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

टॅक्सी चालकाला अटक : या घटनेनंतर आमदार राजू कोरमोरे यांनी याबाबत वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार केली. आमदारांच्या तक्रारीवरून पोलिसांनी टॅक्सी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी टॅक्सी चालक इरफान अली याला गुरुवारी अटक केली. वाकोला पोलिसांनी टॅक्सी चालकावर भारतीय दंड संविधान कलम ५०६ (२) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १७८ (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :

  1. Delivery Boy molested girl : 'तुम सेक्स करोगी' म्हणत डिलिव्हरी बॉयचं तरुणीसोबत अश्लील कृत्य
  2. Police Raped Lady Police : पिस्तुलचा धाक दाखवून पोलिसाचा महिला पोलिसावर वारंवार अत्याचार

ABOUT THE AUTHOR

...view details