मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गप्प का? अव्हाढ मुंबई :बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंगाचा नावलौकिक संपूर्ण देशात आहे. देशभरातून भीमाशंकर येथे श्रद्धाळू मोठ्या भक्ती भावाने दर्शनासाठी येत असतात. मात्र, आसाम राज्यातील भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा दावा आसाम सरकारने केला आहे. त्यावरुन राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.
एकनाथ शिंदेवर टीकेची झोड : आसामचे मुख्यमंत्र्यांनी ज्योतिर्लिंगाबाबत असे वक्तव्य करण्याची क्षमता आली कुठुन? महाराष्ट्र एवढा कमजोर झाला आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. आसामचे मुख्यमंत्री दावा करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गप्प का? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. ते आज विधान भवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधत होते. तसेच आधी राज्यातील उद्योग राज्याबाहेर गेले. राज्यातील जिल्हे देखील राज्याबाहेर जात आहेत. आता महाराष्ट्रातले श्रद्धास्थान देखील बाहेर जाणार का? अशी टीकेची झोड त्यानी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
सरकारवर ओढले ताशेरे :भीमाशंकर ज्योतिर्लिंग बाबत आसामचे मुख्यमंत्री असे वक्तव्य करतात. पौराणिक कथेनुसार सहावे ज्योतिर्लिंग हे भीमाशंकरमधील आहे. असे, असताना आसामचे मुख्यमंत्री थेट ज्योतिर्लिंगावर दावा करतात. महाराष्ट्रातले मुख्यमंत्री गप्प बसतात. महाराष्ट्राने आपली ताकद गमावली आहे का? ही महाराष्ट्रासाठी अत्यंत केविलवाणी परिस्थिती आहे. यावर अद्याप सरकारने कोणतेही भाष्य केलेले नाही असा आरोप अव्हाढ यांनी केला आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांचा दावा दुर्दैवी : मुख्यमंत्र्यांनी थेट आसाम मधील कामाख्य देवी महाराष्ट्रात आणावी. कामाख्य देवीचे मूळस्थान गोदावरी काठी आहे असे सांगावे. मात्र, हिंदू धर्माच्या पौराणिक कथांमध्ये प्रत्येक शक्ती स्थानाचे स्थान दिलेल आहे. त्यामुळे आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला दावा हा अत्यंत दुर्दैवी असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
नाबिया, महाराष्ट्र सत्तास्थापन प्रकरण वेगळे : सध्या सत्ता संघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशाच्या खंडपीठाकडे सुरू आहे. यामध्ये न्यायालयाने नाभीय प्रकरण, महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचे प्रकरण वेगळे असल्याचे मत निदर्शनास आणले आहे. न्यायालयाने नोंदवलेले मत हे योग्य असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. महाराष्ट्रात सत्ता स्थापन झालेली आहे त्यामुळेच नाबिया, महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचे प्रकरण वेगळे असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
.
हेही वाचा -Devendra Fadnavis : मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, फडणवीसांचा पुन्हा खळबळजनक दावा