मुंबई :महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्याची मालिका सर्व पक्ष नेत्यांकडून सुरू आहे. याबाबत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या नेत्यांवर आरोप प्रत्यारोप करत असून महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्याचा निषेध दोन्ही पक्षाकडून सुरू आहे. नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांकडून योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची प्रतिकृती भेट देण्यात आली. मात्र यावेळी राज्यपालांनी आपल्या पायातील चपला काढल्या नसल्याचा फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांच्याकडून ट्विट करण्यात (Criticized Twit) आला आहे.
पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता : राज्यपाल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या दोघांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती हातात घेतली असताना पायातील चपला काढला नसल्याचे ट्विट मधून सांगण्यात आलं आहे. 'राज्यपालांनी ठरवलेलेच दिसतंय, आम्हीं महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या दैवताला किंमत देणार नाही, तुम्ही कितीही आंदोलने करा . बघा हा फोटो बरच काही दर्शवतोय.. पायात पायत्राणे घालुन जर "शिवप्रतीमा" देत असाल आणि बाकी सर्व मुकसंमतीदर्शवित असतील तर या प्रकाराला काय म्हणावे?' असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप ज्येष्ठ नेते राम नाईक आणि अभिनेता आणि खासदार रवी किशन देखील उपस्थित होते. त्यामुळे या फोटो नंतर आता पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.