महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

१ जूनला राष्ट्रवादीची चिंतन बैठक, शरद पवार घेणार प्रत्येक मतदारसंघाचा आढावा

यात राज्यातील प्रत्येक मतदारसंघात आलेल्या अपयशाची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात येणार आहे. पवार स्वतः यात पुढाकार घेणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय

By

Published : May 30, 2019, 4:58 AM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी निराशा पसरली आहे. या निराशेतून पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत चिंतन बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत ते प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.


१ जूनला बैठक आयोजित करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. यात राज्यातील प्रत्येक मतदारसंघात आलेल्या अपयशाची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात येणार आहे. पवार स्वतः यात पुढाकार घेणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले.


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसची चिंतन बैठक होत आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. त्यासोबतच विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीला आपली ताकद असलेल्या मतदारसंघात आणखी काय बदल करावे लागतील, यासाठीच्या सूचना स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मागविल्या जाणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details