महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Supriya Sule on Bhimashankar Jyotirling : उद्योग-रोजगार पळविल्यावर आता ज्योतिर्लिंग.. भीमाशंकर वादावरून सुप्रिया सुळे आक्रमक - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसामात असल्याचा दावा केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यावरून सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Supriya Sule
सुप्रिया सुळे

By

Published : Feb 15, 2023, 9:40 AM IST

मुंबई: भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसामात असल्याचा दावा केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणुन महाराष्ट्रातील खेड तालुक्यातील भिमाशंकर कडे पाहिले जाते. मात्र आता काहीच दिवसांवर महाशिवरात्री महोत्सव तोंडावर आल्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी भिमाशंकर आसाममध्ये असल्याचे सांगितले आहे. याबाबतच्या जाहिराती आसाम सरकारकडून करण्यात येत आहेत.

अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट: ज्योतिर्लिंगाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचे नाही असे ठरवल की काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळविले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे. या ट्वीटमध्ये सुप्रिया सुळे यांनी या जाहिरातीचा फोटोही शेअर केला आहे.

डाकिनीचे जंगल हेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग: घटनाबाह्य ED सरकार आपण गुवाहाटीला आमदारांची फौज पळवून नेली होती. तिथे तुमची सर्व सोय अदृश्य शक्तीच्या वतीने आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचवेळी तुम्ही बदल्यात हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग तर देऊन आला नाहीत ना? अर्थात अशी शक्यता नाकारता येत नाही, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. श्रीमद् आद्य शंकराचार्य आपल्या बृहद रत्नाकर स्तोत्रामध्ये म्हणतात की, भीमा नदीचा उगम आणि डाकिनीचे जंगल हेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हेच १२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे.अन्य कोणतेही नाही. आता आणखी कुणाची साक्ष हवी?, असा प्रश्नही सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र विनंती आहे की, महाराष्ट्राचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा जपण्यासाठी याची तातडीने दखल घ्यावी.

शिव ज्योतिर्लिंगांना विशेष स्थान: महाशिवरात्री 18 फेब्रुवारीला आहे. या दिवशी शिवभक्त भोलेनाथाची पूर्ण विधीपूर्वक पूजा करतात. महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते. भारतात शिवाची अनेक मंदिरे आहेत, जी त्यांना समर्पित आहेत. या मंदिरांमध्ये १२ शिव ज्योतिर्लिंगांना विशेष स्थान आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर भोलेनाथाच्या प्रत्येक भक्ताला ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडावे अशी इच्छा असते. अशा परिस्थितीत महाशिवरात्रीपूर्वी IRCTC ने महादेवाच्या भक्तांना एक खास भेट दिली आहे. IRCTC ने 12 ज्योतिर्लिंगांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी टूर पॅकेज काढले आहे.

हेही वाचा: Jyotirlinga In India भारतातील ज्योतिर्लिंगांना द्यायची आहे का भेट मग ही माहिती वाचा

ABOUT THE AUTHOR

...view details