राष्ट्रवादीला धक्का.! सचिन अहिर आज करणार शिवसेनेत प्रवेश ? - शरद पवार
सचिन अहिर हे राष्ट्रवादीचा मुंबईतील चेहरा मानला जातात. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी जर शिवसेनेत प्रवेश केला तर तो राष्ट्रवादीसाठी सर्वात मोठा धक्का ठरणार आहे.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आणखीन एक महत्त्वाचा नेता पक्षाला राम-राम ठोकत असल्याने निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सचिन अहिर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मला तुमची कायम साथ लाभली आहे, अशीच साथ पुढेही कायम ठेवा. यापुढे आपल्याला अधिक ताकदीने लढायचे आहे, असे म्हणत सचिन अहिर यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले. तसेच आज सकाळी अकरा वाजता 'मातोश्री'वर हजर राहण्याचे आदेश कार्यकर्त्यांना मिळाल्याचे बोलले जात आहे.