महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 8, 2019, 12:41 PM IST

Updated : Nov 8, 2019, 2:47 PM IST

ETV Bharat / state

मी फोनची वाट बघतोय, कुणी फोन करतच नाही - जितेंद्र आव्हाड

भाजपकडून विरोधातील आमदारांना ५० कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेचे विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनीही एक ट्विट केले आहे.

मी फोनची वाट बघतोय, कुणी फोन करतच नाही - जितेंद्र आव्हाड

मुंबई - राज्यात सत्ता स्थापनेवरून सेना-भाजपमधला निर्माण झालेला तिढा काही सुटण्याची काही चिन्हे दिसेनात. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपकडून आमदार फोडा फोडीचे राजकारण केले जाऊ शकते, असा सूर आता, काँग्रेस राष्ट्रवादीसह शिवसेनेतून निघत आहे. त्यातच भाजपकडून विरोधातील आमदारांना ५० कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेचे विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनीही एक ट्विट केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी या ५० कोटींच्या ऑफरवरून 'मीही फोनची वाट पाहतोय, पण मला कोणी फोनच करत नाही, असे ट्विट केले आहे. या माध्यमातून त्यांनी भाजपच्या घोडेबाजारावर निशाणा साधलाय. तसेच निष्ठेमध्ये तडजोड नाही, त्यामुळे मला कोणी फोन करणार नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे. माझ्या पक्ष निष्ठेचा मला गर्व असल्याचेही ते म्हणाले आहेत.

निवडणुकीचे निकाल लागून १५ दिवस उलटून गेले. मात्र, सर्वाधिक जागांवर विजयी झालेल्या भाजपकडून अद्याप सत्ता स्थापनेचा दावा केला जात नाही. तर शिवेसेना मुख्यमंत्री पदावर ठाम असल्याने सत्ता स्थापनेची गणिते जुळून येईनात. अशातच आज सरकार बरखास्त होऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. मात्र, सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून आमदार फोडा फोडीची शक्यता आहे. त्यामुळे आमदार फुटू नयेत याची दक्षता घेत शिवसेनेने त्यांचे सर्व आमदार रंगशारदामध्ये ठेवले आहेत. तर काँग्रेस त्यांच्या आमदारांना जयपूरला पाठवण्याच्या तयारीत आहे.

Last Updated : Nov 8, 2019, 2:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details