मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यानंतर पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष भारती पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी भारती पवार इच्छुक होत्या. मात्र, ऐनवेळी दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्याने पवार यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.उमेदवारीसाठी भाजपात आले नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या विचारधारेत सहभागी होण्यासाठी आले असल्याचे पवार म्हणाल्या.
राष्ट्रवादीच्या भारती पवारांचा भाजप प्रवेश, दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी?
राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यानंतर पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष भारती पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादीच्या भारती पवार यांचा भाजप प्रवेश
भारती पवार या राष्ट्रवादी काँग्रेसवर उमेदवारीच्या मुद्यावरूननाराज असल्याची कळवण आणि दिंडोरीमध्ये जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातील नेत्यांना उमेदवारी न देता ऐनवेळी आलेल्या लोकांना उमेदवारी दिल्याने, त्या नाराज असल्याचेही सांगितले जात आहे. कळवणचे माजी आमदार आणि मंत्री ए. टी. पवार यांच्या भारती या सूनबाई आहेत.
Last Updated : Mar 22, 2019, 6:29 PM IST