मुंबई : कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की रामटेक आणि गडचिरोलीची जागा राष्ट्रवादीने लढावी. तसेच अमरावती मतदार संघ जागा देखील राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. गेल्या निवडणुकीत काही तांत्रिक कारणामुळे अपक्ष उमेदवारामागे पक्ष उभा राहिला होता. ज्याला निवडून दिले तो आपल्यासोबत नाही, त्यामुळे तेथील कार्यकर्त्यांचाही आग्रह आहे की, निवडणूक आपणच लढावी. जागा वाटपा संदर्भात महाविकास आघाडीत कोणतीही चर्चा झाली नाही. शरद पवार यांच्या उपस्थितीत लोकसभा मतदारसंघ निहाय कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे.
दोघे जुळवून घेतील : मंगळवारच्या जाहिरातीवरून डोळे वटारण्यात आल्यानंतर आज लगेच नवी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. आजच्या जाहिरातीत अपेक्षित सर्वांचे आणि फडणवीस यांचे रितसर फोटो छापले गेले असावे. जाहिरात प्रकारणावरून फडणवीस आणि शिंदे यांच्यात चर्चा झाली असली तरी ते मिटवून घेतील, कारण त्यांना महाविकास आघाडीची भीती आहे. राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. शिंदे फडणवीस सरकार मात्र मोठमोठ्या जाहिराती देण्यात मग्न आहे.