मुंबई : दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांची जय्यत ( NCP has Launched a Banner For Shiv Sena ) तयारी सुरू आहे. शिवसेनेचा परंपरागत शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा ( Banner Supporting Shiv Sena Dasara Rally by NCP ) साजरा होणार असून, शिंदे गटाचा मुंबईतील बीकेसी मैदानावर दसरा मेळावा ( NCP Hoardings For Shiv Sena Dasara Melava )साजरा केला जाणार आहे. दसरा मेळावा साजरा करण्यासाठी खास करून मुंबईत एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना अशा दोन्ही गटांकडून बॅनरबाजी पाहायला मिळतेय.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी..... दसरा मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेसाठी बॅनरबाजी :दादर येथे शिवसेना भवन परिसरात शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. तर, तिथेच मातोश्री परिसरातही शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिकांनी यावे, यासाठी आवाहन करण्यात आले आहे. मात्र, या सर्व बॅनरबाजीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे समर्थन करणारे बॅनर सर्वांचेच आकर्षण बनले आहे. याआधी कधीही दसरा मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेसाठी बॅनरबाजी करण्यात आली नव्हती.
दसरा मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मातोश्री परिसरामध्ये बॅनरबाजी :मात्र, शिंदे गटाने बंडखोरी करीत महाविकास आघाडी सरकार पाडले. त्यानंतर होणारा हा पहिलाच दसरा मेळावा असून, या दसरा मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मातोश्री परिसरामध्ये बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे फोटो झळकले आहेत.
राष्ट्रवादीसाठी उद्धव ठाकरे यांचीच खरी शिवसेना :शिवसेनेसोबत राज्यात महाविकास आघाडी सरकार तयार करण्यात आले. मात्र, शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत महाविकास आघाडी सरकार पाडले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून वेगळा होत वेगळा गट तयार केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांची खरी शिवसेना आहे आणि त्यामुळे दसरा मेळावा हा त्यांचाच होणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केले आहे.
दसरा मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मदत होणार असल्याचा आरोप :या वर्षीचा दसरा मेळावा जोरदार पार पाडण्यासाठी उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची मदत घेणार असल्याचा आरोप सातत्याने एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येत आहे. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असून, बीकेसीमध्ये होणारा मेळावा हा बाळासाहेबांच्या विचारांचा मेळावा आहे. त्यामुळे शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्यासाठी लोक जाणार नाहीत याची जाणीव उद्धव ठाकरे यांना आहे. म्हणूनच या दसरा मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते येणार असल्याचा आरोप सातत्याने भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात येतोय.