महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

NCP Crisis : राष्ट्रवादी कुणाची? केंद्रीय निवडणूक आयोगासमोर 'आज' होणार सुनावणी, शरद पवार राहणार गैरहजर - केंद्रीय निवडणूक आयोग

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच असल्याचा दावा केला होता. दरम्यान, यासंदर्भातील सुनावणी 6 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर होणार आहे.

NCP Crisis
राष्ट्रवादी काँग्रेस

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2023, 2:50 PM IST

Updated : Oct 6, 2023, 9:34 AM IST

मुंबई NCP Crisis : काही महिन्यापूर्वी अजित पवारांसह काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं बघायला मिळालं. त्यानंतर अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा ठोकण्यात आला. दरम्यान, हा वाद आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पोहचला आहे. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादावर सुनावणीला सुरुवात होणार आहे.

आम्हाला योग्य न्याय मिळेल :उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच असल्याचा दावा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष म्हणून अजित पवार यांच्या निवडीचं पत्र, आमदारांचा पाठिंबा असलेलं पत्र त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडं सादर केलं होतं. तसंच निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्षातील दोन्ही गटांना नोटीस पाठवून आपलं म्हणणं मांडण्यासाठी सांगितलं होतं. त्यानुसार अजित पवार गटाकडून पक्षाचे नेते, मंत्री, आमदार पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष यांची पाच हजार शपथपत्रं केंद्रीय निवडणूक आयोगाकडं सादर केली आहेत. दरम्यान, आज होणाऱ्या सुनावणीत आकड्यांचा विचार करता निर्णय आमच्या बाजूनं लागेल, असा विश्वास अजित पवार गटाकडून व्यक्त केला जात आहे.



शरद पवार गटाकडून 9 हजार शपथपत्रं : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नाही, असं वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सांगत होते. त्यानंतर निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना आपलं म्हणणं मांडायला सांगितलं. त्यानुसार शरद पवार गटाकडून 9 हजार शपथपत्रं निवडणूक आयोगासमोर दाखल करण्यात आली आहेत. तसंच निवडणूक आयोगात अजित पवार गटानं दाखल केलेल्या शपथपत्रातील त्रुटीसंदर्भातील कागदपत्र देखील सादर करण्यात येणार आहेत.

अभिषेक मनु सिंघवी मांडणार कायदेशीर बाजू: दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शुक्रवारी दुपारी तीन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे. शरद पवार गटाच्या बाजूनं निवडणूक आयोगासमोर अभिषेक मनु सिंघवी कायदेशीर बाजू मांडणार आहेत. तसंच वरिष्ठ नेत्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या शपथ पत्रावर शरद पवार गटाकडून आक्षेप घेतला जाणार आहे.

हेही वाचा -

  1. Ajit Pawar VS Sharad Pawar : रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाई; शरद पवार गट आक्रमक, आगामी निवडणुकीत 'रिटर्न गिफ्ट' देण्याचा इशारा
  2. Sharad Pawar On Varkari Sansthan : देशाला कष्टकऱ्यांची महासत्ता बनवणारी विचारधारा म्हणजे वारकरी संस्थान - शरद पवार
  3. Supriya Sule on Ajit Pawar : अजित पवारांच्या विरोधात मी बोलले नाही, बोलणारही नाही, कारण...; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं
Last Updated : Oct 6, 2023, 9:34 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details