मुंबई - शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. अशात पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व लक्ष कोरोना रुग्णांवर केंद्रित केले आहे. त्यामुळेच पालिका रुग्णालयात खासगी सहभागातून चालवण्यात येणारे अतिदक्षता विभाग बंद पडले आहेत. याचा परिणाम कोरोना व्यतिरिक्त इतर आजाराच्या रुग्णांवर होत आहे. यामुळे, हे अतिदक्षता विभाग त्वरित सुरू करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
पालिका रुग्णालयाचा खासगी सहभागातील अतिदक्षता विभाग सुरू करा, राष्ट्रवादीच्या नगरसेविकेची मागणी - lockdown in mumbai
पालिकेची रुग्णालये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. यामुळे, इतर आजारांच्या रुग्णांना उपचार घेणे कठीण झाले आहे. त्यातच पालिकेने खासगी सहभागातून पालिका रुग्णालयात आयसीयू सुरू केले होते. हे आयसीयू सध्या बंद आहेत. यामुळे, रुग्णांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
मुंबई कोरोना विषाणूचे हॉटस्पॉट बनले आहे. मुंबईत कोरोनाचे 15 हजार 581 रुग्ण असून 596 लोकांचा मृत्यू झाला आहे. शहरात दरदिवशी शेकडो पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने पालिकेची रुग्णालये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. यामुळे, इतर आजारांच्या रुग्णांना उपचार घेणे कठीण झाले आहे. त्यातच पालिकेने खासगी सहभागातून पालिका रुग्णालयात आयसीयू सुरू केले होते. हे आयसीयू सध्या बंद आहेत. यामुळे, रुग्णांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
याची गंभीर दखल घेऊन उपनगरातील रुग्णालयात खासगी सहभागातून सुरू केलेले आयसीयू तातडीने सुरू करावेत, अशी मागणी डॉ. सईदा खान यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी पालिका आयुक्त तसेच आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त यांना पत्र लिहिले आहे. कोरोना व्यतिरिक्त इतर रुग्णांचा त्रास कमी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना खासगी सहभागातून सुरू करण्यात आलेले आयसीयू सुरू करण्याचे आदेश द्यावेत, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.