महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात दुष्काळाची गंभीर स्थिती; राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार, शरद पवारांची माहिती - fadnavis

राज्यात दुष्काळाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळामुळे फळबागांचे  मोठे नुकसान झाले असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

राज्यात दुष्काळाची गंभीर स्थिती - शरद पवार

By

Published : May 4, 2019, 5:21 PM IST

Updated : May 4, 2019, 7:32 PM IST


मुंबई - राज्यात दुष्काळाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. दुष्काळाच्या प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुक्यमंत्र्यांनी भेटणार असल्याचेही पवार म्हणाले.

दुष्काळी परिस्थितीमध्ये राज्य आणि केंद्र सरकारने मदत करण्याची गरज आहे.

प्रमुख मागण्या

१) सरकारने फळबागा वाचवण्यासाठी अनुदान द्यावे.
२) जनावारांसाठी चारा छावण्या काढाव्यात.
३) लोकांसाठी आणि जनावरांसाठी पाण्याची सोय करावी.
४) कर्जमाफी आणि कर्जाचे पुनर्गठन करणे गरजेचे आहे.


नक्षली प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज

नक्षलवाद्यांचे जे हल्ले होतात, त्या प्रश्नाकडे सरकारने जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचे मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले. गडचिरोली आणि चंद्रपूरसारख्या जिल्ह्यात सरकारने विकासाच्या दृष्टीने अधिकची तरतूद करणे गरजेचे आहे. दिवगंत आर आर पाटील राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी गडचिरोलीमध्ये चांगले काम केल्याचेही पवार म्हणाले. आज त्यांची कमतरता जानवत असल्याचेही पवार म्हणाले.

Last Updated : May 4, 2019, 7:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details