मुंबई - शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा (Pratibha Pawar Admitted) पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. आज सकाळीच प्रतिभा पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या रुग्णालयात शरद पवार (Pratibha Pawar Surgery) देखील पोहचले आहेत.
प्रतिभा पवार यांच्यार शस्त्रक्रिया - प्रतिभा पवार यांच्यावर नेमकी कोणती शस्त्रक्रिया होणार याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभा पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच शरद पवार हेदेखील रुग्णालयात पोहोचले आहेत. प्रतिभा पवार यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळत आहे. कोणती शस्त्रकिया आणि कधी होणार याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.
शरद पवार रुग्णालयात -राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. अजित पवार यांनी थेट पक्ष आणि चिन्हावर दावा ठोकला आहे. शरद पवार यांनी अजित पवारांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. राज्यभरात दौरा करून पक्ष बांधणीवर भर देण्याचा निर्धार पवार यांनी केला आहे. राजकीय घडामोडी वाढल्या असताना, दुसरीकडे शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची प्रकृती बिघडली आहे. प्रतिभा पवार यांना मुंबईच्या बीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार यावेळी रुग्णालयात हजर आहेत.