नागपूर - महाराष्ट्राची दुसरी राजधानी नागपूर हे गुन्हेगारीचे केंद्र बनले असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राज्याचे मुख्यमंत्री जिथले, तिथेच गुन्हेगारी आहे. या साऱ्यांविरोधात आवाज उठवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे पवार म्हणाले.
महाराष्ट्राची दुसरी राजधानी गुन्हेगारीचे केंद्र, सुरक्षेवरून पवारांचा भाजपवर निशाणा
महाराष्ट्राची दुसरी राजधानी नागपूर हे गुन्हेगारीचे केंद्र बनले असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आज मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. महिलांवरील अत्याचार व विकृत मनस्थितीवर जरब बसण्याची यंत्रणा ढिसाळ झाली आहे. राज्यकर्ते महिलांना सन्मानाने वागणूक देत नाहीत, ते यंत्रणा काय चालवणार? असा प्रश्नही पवरांनी उपस्थित केला. आपला देश चहूबाजूंनी संकटात सापडला आहे. आपला पक्ष हा विकासासोबत असून, अन्यायावर मात करणारा आहे. यासाठी संघटन मजबूत करणे गरजेचे असल्याचे पवार म्हणाले.