मुंबई - राज्यात मंत्री म्हणून कामकाज करत असताना ते कशा प्रकारे करायचे. तसेच राज्यातील जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी कोणकोणत्या प्रकारे कामकाज करायचे यासाठीचे एक प्रशिक्षणच बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या 16 मंत्र्यांना दिले. इतकेच नव्हे तर मंत्री म्हणून कामकाज करत असताना प्रत्येकवेळी राज्यातील जनता डोळ्यासमोर ठेवा, असे आदेश पवार यांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या बैठकीत दिले.
राज्यातील जनता डोळ्यासमोर ठेवा; शरद पवारांचे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आदेश - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज शरद पवार यांनी आपल्या राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची एक बैठक बोलावली होती. तब्बल तीन तास झालेल्या बैठकीमध्ये पवार यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा अनुभव सांगत प्रत्येक मंत्र्यांनी कामकाज करताना कोण कोणती काळजी घ्यावी आणि समाजाशी नाळ आपली कायम कशी ठेवावी यासाठीचे धडे दिले. प्रशासनात काम करत असताना सरकारी अधिकारी आणि राज्यातील जनता यांच्यात एक समन्वय साधत आपली भूमिका कायम बजावली पाहिजे.
राष्ट्रवादीची बैठक
सरकार स्थापन झाल्यानंतर पोरांनी आपल्या मंत्र्यांची अशा प्रकारची ही पहिलीच बैठक बोलावली होती. या बैठकीत आपण राष्ट्रवादी म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे, मंत्री म्हणून कामकाज करताना कुठेही पक्षाची बदनामी होणार नाही याची काळीजी घ्या. तसेच लोकाभिमुख असेच कामकाज व्हावे यासाठी प्रत्येक मंत्र्यांनी आपले योगदान दिले पाहिजे, अशा सूचनाही पवारांनी यावेळी दिल्या असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.