मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ब्रीच कैंडी रुग्णालयात दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिकांनी दिली. पित्ताशयाचा त्रासमुळे पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आगोदर ३० मार्चला त्यांच्यावर एक यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
शरद पवारांवर दुसरी यशस्वी शस्त्रक्रिया ; प्रकृती स्थिर
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडली होती. पवार यांना अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पहिली शस्त्रक्रिया यशस्वी
काही दिवसांपूर्वीशरद पवार यांची प्रकृती सायंकाळी अचानक बिघडली होती. पवार यांना अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पवार यांच्या तपासण्या करण्यात आल्यानंतर त्यांना पित्ताशयाच्या विकाराचे निदान झाले होते. पवार यांच्यावर ३१ मार्च रोजी शस्त्रक्रिया केली जाणार होती. मात्र, पवारांना अचानक त्रास होऊ लागल्यामुळे त्यांच्यावर ३० मार्चलाच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर ७ दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर १५ दिवसानंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार होती.