महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

क्षितीजला ड्रग्ज प्रकरणात नाहक गोवण्यात आले, वकील मानेशिंदे यांचा आरोप

प्रसाद क्षितीज यांना ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात नाहक गोवण्यात आले असल्याचा गंभीर आरोप क्षितीज यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी केला आहे.

Drugs probe : Kshitij Ravi Prasad remanded in NCB custody till October 3
क्षितीज यांना ड्रग्ज प्रकरणात नाहक गोवण्यात आले, वकील माने शिंदे यांचा आरोप

By

Published : Sep 28, 2020, 11:31 AM IST

Updated : Sep 28, 2020, 12:05 PM IST

मुंबई -धर्मा प्रोडक्शनचा माजी कार्यकारी निर्माता प्रसाद क्षितीजला ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात नाहक गोवण्यात येत आहे, असा गंभीर आरोप क्षितीजचे वकील सतीश मानेशिंदे यांनी केला आहे. शिवाय, या प्रकरणात निर्माता करण जोहरसह अन्य काही लोकांची नावे घेण्यासाठी त्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही मानेशिंदे यांनी केला आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन पुढे आल्यानंतर सुशांतची गर्लफ्रेण्ड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. त्यानंतर रियाच्या तपासात या प्रकरणात अनेक महत्त्वाचे धागेदोरे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) हाती आले. तेव्हा एनसीबीने या प्रकरणाचा आणखी सखोल तपास सुरू केला. त्यानंतर क्षितीज प्रसाद याला अटक करण्यात आली. आता क्षितीज ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या ताब्यात आहे. यावर प्रसादचे वकील मानेशिंदे यांनी, क्षितीजला या प्रकरणात नाहक गोवले जात असल्याचा आरोप केला आहे.

क्षितीज प्रसादचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले की, क्षितीजला चौकशीदरम्यान, त्रास व ब्लॅकमेल करण्यात येत आहे. त्याच्यावर करण जोहरसह अन्य लोकांची नावे घेण्यासाठी दबाव आणला जात आहे. नाव घेतल्यास तुम्हाला सोडू, असे सांगण्यात येत आहे, असा दावाही त्यांनी केला. मागील आठवड्यात क्षितीज यांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

हेही वाचा -शिवसेनेच्या कार्यक्रमात काँग्रेस नेत्यांचे फोटो का नसतात? संजय निरुपमांचा टोला..

हेही वाचा -'शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणार, शिवसेना आमच्या सोबत'

Last Updated : Sep 28, 2020, 12:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details