महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

करण जोहर एनसीबीच्या रडारवर! पार्टी प्रकरणी होऊ शकते चौकशी - करण जोहर एनसीबी चौकशी

बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर वादग्रस्त गोष्टींसाठी कायम चर्चेत असतो. एका पार्टी प्रकरणी एनसीबी करणची चौकशी करण्याची शक्यता आहे. करणच्या या पार्टीत बॉलिवूडचे अनेक बडे कलाकार सहभागी झाले होते.

Karan Johar
करण जोहर

By

Published : Sep 18, 2020, 5:41 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाल्यापासून अनेक मोठे खुलासे झाले आहेत. या प्रकरणाची चौकशी करताना अमली पदार्थ विरोधी पथकाला(एनसीबी)ला बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनची माहिती मिळत आहे. आतापर्यंत अनेकजणांची नावे समोर आली असून आता निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

शिरोमणी अकाली दल पक्षाचे नेते मंजिदर सिंग शिरसा या करण जोहरविरोधात एक तक्रार एनसीबीकडे केली होती. आता ही तक्रार एनसीबीच्या मुख्य कार्यालयाने मुंबईतील एनसीबी पथकाकडे सुपूर्त केली आहे. या तक्रारीमध्ये करण जोहरच्या एका पार्टीचा उल्लेख आहे. करणच्या या पार्टीत बॉलिवूडचे अनेक बडे कलाकार सहभागी झाले होते. यात दीपिका पादुकोण, विकी कौशल, मलायका अरोरा, वरुण धवन, अर्जुन कपूर आणि शाहिद कपूर या मोठ्या कलाकारांचाही समावेश होता.

करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर करण जोहरने आपल्या पार्टीतील कोणत्याही कलाकाराने ड्रग्ज घेतले नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, आता याबाबत रितसर तक्रार मिळाल्याने एनसीबी करण जोहरला सुद्धा चौकशीसाठी बोलवू शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details